शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेस आठ हजार जणांची संमती; १८ गावांचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:07 IST

हरकती, सूचना नोंदवण्याची मुदत उद्या संपणार

कल्याण : केडीएमसीतील २७ पैकी १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासंदर्भातील हरकती व सूचना शुक्रवारी, २४ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदवायच्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच आठ हजार दोन जणांनी १८ गावांची नगर परिषद स्थापन करण्यास संमती दर्शवली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे.

राज्य सरकारने २७ गावांपैकी नऊ गावे केडीएमसीत ठेवून १८ गावे वगळल्याचे जाहीर केले होते. कोरोनाकाळात ही प्रक्रिया पुढे रखडली होती. मात्र, सरकारने या नगर परिषदेसाठी महिनाभरात हरकती, सूचना मागवत असल्याचे २४ जूनला जाहीर केले होते. त्यानुसार, २४ जुलैला त्याची मुदत संपत आहे. मात्र, त्यापूर्वीच १८ पैकी १६ गावांतील आठ हजार दोन जणांनी नगर परिषदेला संमती दर्शविली आहे.

सहमती दर्शवणाऱ्यांमध्ये १६ गावांमध्ये कोळेगाव, गोलवली, उंबार्ली, वसार, आशेळे, माणोरे, निळजेपाडा घेसर, निळजे, माणगाव, आडिवली, दावडी, हेदुटणे, चिंचपाडा, सोनारपाडा, भाल, पिसवलीचा समावेश आहे. तर, दोन गावांनी सहमती दर्शविलेली नाही. त्यामुळे १८ गावांच्या नगर परिषेदला अनुकूल प्रतिसाद असल्याचे हरकती, सूचनांच्या प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीचे गंगाराम शेलार, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, गुलाब वझे, अर्जुन चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर, विजय भाने यांनी एक बैठक घेतली आहे. १८ गावांची नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. मात्र, महापालिकेत ठेवलेली नऊ गावेही पुढे जाऊन १८ गावांच्या स्वतंत्र नगर परिषेदत समाविष्ट करावीत, अशी मागणी केली आहे. केडीएमसीत राहिलेल्या गावांपैकी काटई, संदप, आजदे, सांगर्ली, उसरघर, घारिवली या गावांनी आम्हाला मनपा नको, १८ गावांच्या स्वतंत्र नगर परिषदेत समाविष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

हरकती, सूचनांचा फार्स ठरू नये

च्सरकारने यापूर्वीही २७ गावांच्या प्रकरणी हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यावेळी गावे मनपात समाविष्ट करण्यास विरोध असलेल्या हरकती जास्त असतानाही त्या विचारात न घेता तत्कालीन भाजप सरकारने गावे घिसाडघाईने महापालिकेत समाविष्ट केली.च्त्यामुळे आताच्या हरकती व सूचनांचे प्राबल्य कोणत्या निर्णयाच्या बाजूने आहे, ते पाहूनच सरकारी यंत्रणेने निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा, पुन्हा हरकती व सूचनांचा फार्स ठरू शकतो, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.

नागरिकीकरणाचा निकष योग्य नाही

च्नऊ गावांमध्ये नागरिकीकरण जास्त प्रमाणात झाल्याने ती केडीएमसीत ठेवल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. प्रत्यक्षात १८ गावांच्या यादीतील आशेळे माणोरे हे उल्हासनगर व केडीएसमीच्या सीमेवर आहे. तर, चिंचपाडा कल्याण पूर्वेतील शहरी भागात आहे.च्माणगाव हे डोंबिवलीच्या वेशीलगत आहे. दावडी व पिसवलीत दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या गावांत नागरिकीकरण जास्त नाही, असा दावा करत ही गावे १८ गावांच्या नगर परिषदेच्या प्रक्रियेत समाविष्ट केली गेली आहेत. त्यामुळे नागरिकीकरणाचा निकष हा गावे वगळण्यासाठी योग्य नाही, असे जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका