शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विश्वासघात करून लादलेल्या महापालिकेच्या करवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार 

By धीरज परब | Updated: April 25, 2023 17:50 IST

काँग्रेस रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल असा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - प्रशासनाने अर्थसंकल्प सादर करण्या आधी झालेल्या काँग्रेस शिष्टमंडळ सोबतच्या बैठकीत कोणतीही करवाढ करणार नसल्याचे आश्वस्त केले होते. मात्र त्या नंतर देखील नियमबाह्यपणे करवाढ करून जनतेचा विश्वासघात केल्याने करवाढ मागे न घेतल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल असा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.

जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी गटनेते जुबेर इनामदार, माजी नगरसेविका मर्लिन डीसा, रुबिना शेख, गीता परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त दिलीप ढोले यांची महापालिका मुख्यालयात भेट घेऊन  चर्चा केली व करवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या उपस्थितीत आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन आयुक्त म्हणून ढोले यांनी दिले होते असे प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहीर करूनही  आता नव्याने १०% रस्ता कर, १० ते १५% पाणीपुरवठा लाभ कर, २५ ते ३०% पाणीपट्टी मध्ये करवाढ, अर्धा टक्का अग्निशमन सेवा करवाढ तसेच परिवहन सेवा बस भाड्यात  वाढ, अश्या प्रकारचे कर वाढीचे प्रशासकीय निर्णय का व कसे घेण्यात आले ? असा सवाल करीत काँग्रेस ने प्रस्तावित  करवाढीला विरोध केला आहे.   उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू नका असे आयुक्तांना सांगण्यात  आले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत असून शासनाने शहरासाठी अडीज हजार कोटी दिल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. जर इतका निधी शासनाने कामांसाठी दिला आहे तर मग नागरिकांवर इतक्या मोठ्या प्रमाणात करवाढ कशासाठी ? असा सवाल सामंत यांनी केला.

स्वतः सत्तेत असून एकीकडे करवाढ करायची आणि दुसरीकडे करवाढीचा विरोध करण्याची नौटंकी करायची अशी टीका जुबेर यांनी केली आहे. प्रशासकीय राजवट असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने करवाढ केली आहे ती अयोग्य असून करवाढीचा निर्णय रद्द करून करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनहितार्थ काँग्रेसला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर