शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या मदतीला धावली काँग्रेस, उल्हासनगरात तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 19:04 IST

शहरातील कॅम्प नं- १ ते ५ मधिल काँग्रेस पक्षाच्या स्वंयसेवकांचे नावे यावेळी जाहिर केली. काँग्रेसने स्थापन केलेली तक्रार तक्रार निवारण कक्षाची टीम महापालिका आरोग्य विभाग व डॉक्टर सोबत संपर्कात असून टीम महापालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करणार आहे.

ठळक मुद्देपक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी नेहरू चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कोविड तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून एक टीम तैनात केली. तसेच ७८७५५४६००० व ०२५२५२०९९९ असे दोन हेल्पलाईन नंबर आज पासून सुरू केले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य माहिती व मदत मिळण्यासाठी शहर काँग्रेसने कोविड तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीं दिली. देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून कोरोना रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना इतभूत माहिती मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यांना माहिती व मदतीचा हात देण्यासाठी शहर काँग्रेस पुढे सरसावली आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी नेहरू चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कोविड तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून एक टीम तैनात केली. तसेच ७८७५५४६००० व ०२५२५२०९९९ असे दोन हेल्पलाईन नंबर आज पासून सुरू केले. नागरिकांनी तसेच कोरोना रुग्ण २४ तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाईन नंबरवर माहिती व मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

शहरातील कॅम्प नं- १ ते ५ मधिल काँग्रेस पक्षाच्या स्वंयसेवकांचे नावे यावेळी जाहिर केली. काँग्रेसने स्थापन केलेली तक्रार तक्रार निवारण कक्षाची टीम महापालिका आरोग्य विभाग व डॉक्टर सोबत संपर्कात असून टीम महापालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करणार आहे. टीमला पक्षाच्या प्रदेश टीमचे सहकार्य लाभणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अशा कठिण प्रसंगी शहरवाशीयांनी धैर्य ठेवावे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. असे आवाहनही साळवे यांनी केले. महराष्ट्रात होत असलेला रक्त तुटवडा लक्षात घेता, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पक्षाच्या वतीने १४ एप्रिल रोजी रेडक्रॉस हॉस्पिटल येथे सकाळी ११ ते ३ दरम्यान रक्तदानाचे शिबीराचे आयोजन केल्याची माहिती साळवे यांनी दिली. 

भ्रम निर्माण करणाऱ्या पासून सावध रहा..... साळवे

देशात सर्वाधिक प्रगतिशील राज्यात काही राजकीय नेते कोरोनावर मात करण्याचा मंत्र व माहिती न देता. नागरिकांत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सतत करीत आहेत. अश्या नेत्या पासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस