शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी

By सुरेश लोखंडे | Updated: April 17, 2023 16:36 IST

फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे: जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलास्यामुळे काॅग्रेस पक्षाने "शर्म करो..." असा नारा देत निदर्शने ठाण्यातही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ,भाजपा सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना ठाणे काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,जम्मू-काश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पंतप्रधानाच्या अत्यंत विश्वासू  असतानाही त्यांनी अत्यंत निडरपणे पुलवामा घटनेचा खुलासा केला आतापर्यंत आपण एका वेगळ्याच पद्धतीने पुलवामा घटनेला बघत होतो परंतु मलिक यांच्या या विधानामुळे केंद्रातील भा.ज.पा.सरकारचे या घटनेत अक्षम्य चूक झाली असून या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सागितले?

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यानी या प्रश्नाचा खुलासा करून जनतेला उत्तर दिले पाहिजेत अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केले.  पुलवामा घटनेतील वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठुन आले होते? असा सवाल करून  या घटनेतील ४० जवानांचे बलिदान हे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी षडयत्र रचून लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठीच केले होते, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 श्रीसदस्यांना श्रध्दाजली

ठाण्यातील शहर काॅग्रेसच्या वतीने" शर्म करो मोदीजी" हे आंदोलन सूरू करण्यापूर्वी रविवारी खारघर येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या श्रीसदस्यांना सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर काॅग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सूरू केले.