शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

ठाणे जिल्ह्यात अनलॉक बाबत संभ्रम कायम, रविवारी अध्यादेश निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 22:17 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ठरविणार प्रत्येक महापालिकेचे स्तर

ठाणे  : ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिकेच्या अनलॉक संदर्भात शनिवारी दिवसभर संभ्रम कायम राहिला. अनलॉक संदर्भात प्रशासनाच्या वतीने कोणताही नवीन अध्यादेश काढण्यात आलेला नाही. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात राज्यतील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीला पहिल्या टप्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यात व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी ठाण्यासह इतर महापालिकांना आपण कोणत्या क्रमांकावर आहोत, याचा संभ्रम दिसून आला. त्यात आता ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहराचा स्तर ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार रविवारी या संदर्भात जिल्हाधिका:यांकडे प्रत्येक महापालिकेचे आयुक्त आपला कोरोनाचा अहवाल सादर करणार असून त्यानंतरच प्रत्येक महापालिकेचा स्तर निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.        

ब्रेक द चेन च्या अंतर्गत आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची प्रक्रि या सुरु  करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र ठाण्याच्या रुग्णवाढीचा दर  हा ५ टक्यांपेक्षा अधिक आहे. तसेच शनिवारी ठाणे  हे थेट तिसऱ्या  टप्प्यात फेकले गेल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील इतर शहरांबाबतही संभ्रम निर्माण झाला. कोणती महापालिका कोणत्या क्रमांकावर आहे, याची माहिती शनिवारी उशिरार्पयत समजू शकली नाही.  त्यामुळे ठाणे अनलॉक होणार ही नाही याबात चर्चना उधान आले. व्यापारी वर्गात तर ठाणे  अनलॉक होणार अशी बातमी वा:यासारखी पसरल्याने अनेकांनी संपूर्ण दिवसभर दुकाने उघडे ठेवण्याची तयारी देखील केली होती. मात्र शनिवारी रात्री उशिरा पर्यंत प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही .

हा संभ्रम दुर करण्यासाठी ठाणे  महापालिकेकडून शनिवारीच नवीन अद्यादेश निघेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत बैठका सुरु  असल्याने यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान अनलॉक बाबत राज्याचे मुख्य सचिवांबरोबर चर्चा व्हिडीओ कॉन्सर्फन्स द्वारे चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला घेण्यास सांगितले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या सुत्रंनी दिली. त्यानुसार या विभागाचे प्रमुख जिल्हाधिकारी असल्याने या बाबतचा निर्णय आता रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. रविवारी जिल्ह्यतील सर्वच महापालिका कोरोना अहवाल या बैठकीत सादर करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या स्तर निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणे असो किंवा कल्याण डोंबिवली महापालिका नेमकी कोणत्या स्तरावर असणार आणि कोणत्या शहरात काय काय खुले होणार कसे र्निबध असणार याचा फैसला आता रविवारच्या सुटटीच्या दिवशी होणार आहे.

ठाणे  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला महापालिकेचा स्तर निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारी आम्ही ठाणो शहराचा अहवाल त्यांच्या समोर सादर करणार आहोत. त्यानंतरच ठाण्याचा स्तर निश्चित होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील आध्यादेश रविवारी काढला जाईल.(डॉ. विपीन शर्मा - आयुक्त, ठामपा)

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या