शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात रसायनांबाबत गुप्तता धोक्याची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:27 IST

आगीच्या १४४ घटनांमध्ये तिघांचा मृत्यू: अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका

सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पंधरा जखमी झाले आहेत. कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल साठा आहे याची माहिती स्थानिक अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात असल्याने आग विझविताना अडचणी निर्माण होत आहेत.सर्वाधिक मोठा औद्योगिक पट्टा म्हणून टीटीसी (ट्रान्स ठाणे क्रिक) एमआयडीसी क्षेत्राची ओळख आहे. या औद्योगिक क्षेत्रात साडेचार हजारांहून अधिक छोटे-मोठे उद्योगधंदे आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर होत असून, अति ज्वलनशील रसायनांचाही समावेश आहे. अनेकदा अशा ठिकाणी सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली जात नसल्याने आगीच्या दुर्घटना घडतात. त्यानुसार टीटीसी औद्योगिक क्षेत्रात गतवर्षात आगीच्या १४४ दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी रबाळे झोनमध्ये ७४ तर नेरूळ झोनमध्ये ७० घटनांचा समावेश आहे. त्यात आगीच्या सहा दुर्घटना या गंभीर स्वरूपाच्या होत्या. या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.गेल्यावर्षी सर्वाधिक आगीच्या घटना जून व ऑगस्ट महिन्यात घडल्या आहेत. रबाळे झोनमध्ये जून महिन्यात १७ ठिकाणी आग लागली होती. तर नेरूळ झोनमध्ये ऑगस्टमध्ये १७ ठिकाणी आग लागली होती.

उघड्यावर केला जातो रसायनाचा साठाnएमआयडीसी क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांमध्ये नियमांची पायमल्ली करून धोकादायक वस्तूंचा साठा करून ठेवला जात आहे. काही ठिकाणी कंपनीलगतच्या मोकळ्या जागेतच गोडाऊन बनवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी उघड्यावरच रसायनाचा साठा केला जात आहे. तर बंद पडलेल्या कंपन्यांच्या ठिकाणी भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहेत. nयामुळे एखादी छोटीशी आग आजूबाजूच्या कंपन्यांपर्यंत पसरून मोठ्या दुर्घटना घडत आहेत. अशातच नियमांच्या आडून कंपन्यांमध्ये वापर होत असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रापासून गुप्त ठेवली जात आहे. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या नियोजनात अडथळे येत आहेत. 

एमआयडीसीच्या दोन्ही अग्निशमन केंद्रांना वर्षभरात आगीचे १५१ कॉल आले होते. त्यापैकी १४४ कॉल हे एमआयडीसी तर ७ क्षेत्राबाहेरील होते. आगीच्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले.- आर.बी. पाटील, अग्निशमन केंद्र अधिकारी, एमआयडीसी