शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 10:47 IST

ठाणे विकास परिषद २०२४ चा समारोप

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे, तर मुंबई महानगर प्रदेश हे महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायची तर मुंबई महानगर प्रदेशाची क्षमता १.५ ट्रिलियन डॉलरची आहे. ठाणे जिल्ह्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलरइतके करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे हे विकासाचे खणखणीत नाणे आहे, हे सिद्ध करायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.  

जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य  ‘ठाणे विकास परिषद २०२४’च्या समारोपप्रसंगी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहातील कार्यक्रमात शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, निती आयाेगाने मुंबई महानगराला जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.  ठाणे जिल्ह्याचा जीडीपी ७.५ टक्के आहे. ताे पुढील ३० वर्षांत २० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तरी ठाण्यात काय क्षमता आहे, ते ठाणेकरांनाच माहीत नव्हते.

विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात महाराष्ट्र जीडीपी, औद्योगिक प्रगती, विदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा प्रकल्प या सर्वच बाबतींत देशात आघाडीवर आहे.  देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.  राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सात ते आठ तासांत पोहोचता आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.  सरकारने पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ८० टक्के गुंतवणुकीच्या करारांची अंमलबजावणी केल्याचा दावा शिंदे यांनी केला. 

... म्हणून वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला 

वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने त्या प्रकल्पाला सहकार्य न केल्याने तो महाराष्ट्रातून गेला, असा दावा त्यांनी केला. 

हा एकनाथ शिंदे लवकरच महाविकास आघाडीचे सरकार बदलून टाकणार आहे, याची त्या कंपनीला पूर्वकल्पना असती तर ते महाराष्ट्र सोडून गेेले नसते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आमचे सरकार स्पीड ब्रेकर टाकणारे नव्हे, तर  ते स्पीड ब्रेकर काढणारे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे