शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
4
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
5
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
6
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
7
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
8
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
9
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
10
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
11
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
12
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
13
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
14
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
15
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
16
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
17
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
18
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
19
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
20
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...

उद्योग व्यवसायांना मिळणार सवलत; ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:52 IST

शुल्क १0 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

ठाणे : आर्थिक गर्तेत सापडलेल्या उद्योगांना थोड्याफार प्रमाणात का होईना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्क ५० तर साठा परवाना शुल्क ४० टक्के कमी करण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेले दर आणखी कमी करण्याच्या सूचनेसह हा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला. पालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे दर ठरविले जाणार असून त्यामध्ये १० टक्के इतकेच शुल्क आकारण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून उद्योगधंदा व्यवसाय परवाना आणि साठा परवाना शुल्क आकारले जाते. या शुल्काच्या दरामध्ये महापालिकेने चार वर्षांपूर्वी वाढ करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यास कोपरी फायर वर्क्स असोसिएशन, कोपरी फटाका मार्केट, औद्योगिक संघटना, ठाणे लघुउद्योग संघटना (टिसा) आणि पोखरण लोक स्मॉल स्केल औद्योगिक संघटना (प्लेसा) या संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या शुल्कवाढीविरोधात जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त यांच्याकडे तक्र ार केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून उद्योगधंदा व्यवसाय परवाना शुल्कात ५० टक्के तर साठा परवाना शुल्कात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र आर्थिक मंदीचा सामना करणाºया उद्योजक आणि व्यापाºयांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने केलेली शुल्क कपात पुरेशी नसून या शुल्कामध्ये आणखी कपात करण्याची गरज आहे, असे मत नजीब मुल्ला यांनी महासभेत व्यक्त केले.विरोधी पक्षनेत्याचेही अनुमोदनप्रशासनाने ठरविलेले दर रद्द करून त्याऐवजी पालिका पदाधिकाºयांच्या बैठकीत ठरविण्यात येणारे दर लागू करावेत, या सूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव महासभेसमोर मांडण्यात आला.या प्रस्तावास सभागृह नेते नरेश म्हस्के आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार आता हे दर १० टक्कयांपर्यंत येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका