शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

निवडणुकीसाठी मनसेला सतावतेय निधीची चिंता

By admin | Updated: April 24, 2017 02:08 IST

भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू

अनगाव : भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. मात्र, मनसेमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे. निवडणुकीसाठी पक्षाकडून निधी दिला जातो. पण, मनसेकडून निधी मिळत नसल्याने स्थानिक नेते तो कसा उभा करायचा, याचा विचार करत आहेत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.शहरातील पक्षाची स्थिती, निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवायची, याबाबत शनिवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यात प्रामुख्याने निवडणुकीसाठी निधी कसा उभारायचा, यावर अधिक भर देण्यात आला. जर पक्षाने उमेदवारांसाठी निधी दिला, तर नव्वदपेक्षा अधिक इच्छुक मनसेकडून निवडणूक लढवतील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यात जिल्हाध्यक्ष मदन पाटील, शहराध्यक्ष अफसर खान, प्रदीप बोडके उपस्थित होते.नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये मनसेचे इंजीन सायडिंगला गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नुकतीच पदाधिकारी, नेत्यांची बैठक झाली. त्यात काहींनी नेत्यांवर तोंडसुख घेतले. दरम्यान, मनसेने यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी भिवंडीला कसे बकाल केले, भ्रष्टाचार हा प्रचारातील प्रमुख मुद्दा असेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मनसेने शहरातील समस्यांविरोधात धरणे आंदोलन केले होते. खासकरून पाणीटंचाईवर महिलांनी थाळीनाद केला होता. त्यानंतर, आयुक्तांनी १५ जलकुंभांचे काम हाती घेतले. मनसेला निवडून दिल्यास आम्ही शहराचा विकास त्याचबरोबर पारदर्शक कारभार करू, अशी ग्वाही स्थानिक नेत्यांनी दिली आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनाही प्रचारासाठी बोलवण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत विचारविनिमय झाला, असेही पाटील यांनी नमूद केले. (वार्ताहर)