शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

३० डिसेंबर ते २४ फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रात संपूर्ण स्वच्छतेची मोहीम

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 27, 2023 17:37 IST

महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ( डीप क्लिन मोहीम) सुरूवात शनिवार, ३० डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. ही मोहीम २४ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणे आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार, महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात ही मोहिम राबविण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबविली जाईल. शनिवार, ३० डिसेंबर २०२३ रोजी पहिली प्रभाग समिती आणि शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४ नववी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबविण्यात येईल. संपूर्ण स्वच्छता मोहिमेत स्वच्छता, स्वच्छतेतील सातत्य आणि सुधारणा या तीन तत्वांचा समावेश आहे. दैनंदिन स्वच्छतेच्या पलिकडे कानाकोपऱ्यातील सफाई असे या मोहिमेचे स्वरुप आहे. ज्या स्वच्छतेसाठी विशेष परिश्रम करण्याची आवश्यकता असल्याने, दैनंदिन स्वच्छतेत ज्या कामांचा समावेश होत नाही, अशी सर्व कामे या मोहिमेत तडीला नेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जास्तीची यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात येईल. रस्ता झाडणे, रस्ता धुणे याच्यासह रस्ता सर्वांगीण साफ करणे असे या मोहिमेचे स्वरुप आहे.  मोहिमेची व्याप्ती

या मोहिमेत रस्ते, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, रस्ते दुभाजक - मिडियन, फूटपाथ, फूटपाथ लगतच्या भिंती, तलाव, मैदाने, उद्याने, सार्वजनिक शौचालये, रेड स्पॉट, मार्केट आणि परिसर, बस स्टॉप, नाले, उघडी गटारे, रस्त्यावरील नाम आणि दिशादर्शक फलक, डी पी बॉक्स आणि परिसर, महत्त्वाची ठिकाणे, पुतळे, स्मारके, उड्डाणपूल आणि पूलांखालील जागा, सार्वजनिक वहिवाटीच्या सर्व जागा यांची साफसफाई करण्यात येईल. तसेच, सार्वजनिक शौचालयांच्या सफाईसह परिसर, शौचालयाकडे येणारा रस्ताही स्वच्छ केला जाईल. त्याचबरोबर, बेवारस वाहने हटवणे, अनधिकृत फलक, बोर्ड, होर्डिंग, लोंबकळणाऱ्या वायर्स काढणे आणि धूर फवारणी करणे यांचाही या मोहिमेत समावेश आहे.

मलवाहिन्या, चेंबर ओव्हरफ्लो होत असतील तर त्यांची सफाईही केली जाईल. रस्ते साफ करताना कचरा, धूळ, माती, डेब्रिज हटविण्यात यावे. रस्ते दुभाजक, कर्बस्टोन यांची सफाई करताना आवश्यकतेनुसार त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका