शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांची लोकायुक्तांकडे तक्रार, पालिका आयुक्त अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:21 IST

बेकायदा बांधकामाला पालिका आयुक्तांचा आशीर्वाद असल्याची तक्रार राज्य लोकायुक्तांकडे केल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

उल्हासनगर - बेकायदा बांधकामाला पालिका आयुक्तांचा आशीर्वाद असल्याची तक्रार राज्य लोकायुक्तांकडे केल्याने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. लोकायुक्तांनी लोकसेवकांच्या हुद्यासह त्यासंदर्भातील पुरावे तक्रारदाराकडे मागितल्याने पालिका कारभाराचे वाभाडे निघाले आहे.उल्हासनगर महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह नियुक्त केलेले प्रभाग अधिकारी बेकायदा बांधकामासह बांधकाम परवानगी देणे आदी प्रकारांना पाठीशी घालत असल्याची तक्रार अ‍ॅड. सतीश शहा यांनी राज्य लोकायुक्तांकडे ४ मार्च रोजी केली. लोकायुक्तांकडील तक्रारीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. लोकायुक्त विभागाने तक्रारीची दखल घेत महापालिका लोकसेवक यांच्यावर मोघम आरोप न करता, लोकसेवकांचा हुद्दा व बेकायदा बांधकामाचा पुरावा २० मार्चपूर्वी प्रतिज्ञापत्र व पुराव्यानिधी सादर करण्यास सांगितले. शहा यांनी लोकायुक्तांकडे पुरावे सादर केल्यास आयुक्तांसह इतर अधिकारी वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, पालिका आयुक्त अच्युत हांगे बेकायदा बांधकामप्रकरणी किती बळी घेणार, असा प्रश्न मनसेचे मैन्नुद्दीन शेख यांनी विचारला आहे. एका वर्षात बेकायदा बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांना वीजवाहिन्यांचा धक्का बसून तिघांचा बळी गेला असून आयुक्त हांगे अशांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी अनेक पक्क्या बांधकामांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्य लोकायुक्तांकडे अ‍ॅड. शहा यांनी तक्रार केली असून त्यांना बेकायदा बांधकामांचे पुरावे लागत असतील, तर मी देण्यास तयार असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. तर, महापालिका अतिक्रमण विभगााचे प्रमुख गणेश शिंपी यांनी विनापरवाना शहरात काम होत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.नगररचनाकार विभाग कायमच राहिला चर्चेमध्येमहापालिकेचा नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वीच्या बहुतांश नगररचनाकारांनी जेलची हवा खाल्ली आहे. काही जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. संजीव करपे हे नगररचनाकार तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले आहेत. याबाबत, नगररचनाकार मिलिंद सोनावणी यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर