शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळी केल्याने महापौर जावेद दळवी विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:36 IST

भिवंडी : महानगरपालिकेमार्फत गैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडफोड संदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या व्यक्तीस महापौरांनी शिवीगाळी करीत कार्यालयाबाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने आज सायंकाळी निजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.महानगरपालिके मार्फत शहरात रस्ता रूंदीकरणाच्या निमीत्ताने वारंवार तोडू कारवाई करण्यात येते. अशा वेळी बांधकाम विभाग व शहर ...

ठळक मुद्देनिजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी ंविरोधात हा दुसरा गुन्हागैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडू कारवाई संदर्भात परिसरातील काही नागरिक महापौर दालनातसिध्दीक मोमीन याने महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात केली तक्रार

भिवंडी : महानगरपालिकेमार्फत गैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडफोड संदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या व्यक्तीस महापौरांनी शिवीगाळी करीत कार्यालयाबाहेर काढल्याचा राग आल्याने त्याने आज सायंकाळी निजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.महानगरपालिके मार्फत शहरात रस्ता रूंदीकरणाच्या निमीत्ताने वारंवार तोडू कारवाई करण्यात येते. अशा वेळी बांधकाम विभाग व शहर विकास विभागामार्फत नागरिकांच्या तोडलेल्या मालमत्तेचा पंचनामा त्याचवेळी देण्यात येत नाही. तसेच नियमांप्रमाणे पर्यायी जागा व मोबदला देण्यात येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अशा तोडू कारवाईस शहरातील नागरिक पालिका प्रशासनास सहकार्य करीत नाही.शहरातील नागरिकांना शहराचा विकास आराखडा पहावयांस मिळावा यासाठी हा विकास आराखडा पालिकेच्या दर्शनी भागात लावण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही.त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांमध्ये गैरसमज पसरले आहेत. त्या अनुषंगाने शांतीनगर रोडवरील गैबीनगर भागात सुरू असलेल्या तोडू कारवाई संदर्भात परिसरातील काही नागरिक आज सोमवार रोजी सायंकाळी महापौर दालनात माहिती घेण्यासाठी व बातचीत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी गैबीनगर येथील सिध्दीक हाजी मोहम्मद शफी मोमीन याने महापौर दालनात जाऊन तोडू कारवाईबाबत महापौर जावेद दळवी यांच्याकडे तोंडी तक्रार केली. तेंव्हा दळवी यांनी त्यास लेखी तक्रार देण्यास सांगीतले. मात्र लेखी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याचे प्रत्युत्तर सिध्दीक मोमीन याने महापौरांना दिल्याने दोघांमधील वाद वाढून त्यांनी एकमेकांना शिवीगाळी केली.त्याचवेळी महापौरांनी सिध्दीक मोमीन याला शिपायांमार्फत आपल्या दालनाबाहेर काढले.आपला अपमान केल्याचा राग येऊन सिध्दीक मोमीन याने महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीसांनी महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात महापौर जावेद दळवी विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा