शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: March 17, 2017 06:04 IST

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते व केडीएमसीविरोधात विविध प्रकरणांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केडीएमसी

कल्याण : माहिती अधिकाराचे कार्यकर्ते व केडीएमसीविरोधात विविध प्रकरणांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन दबाव आणत आहेत, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सिद्धिविनायक सोसायटीत गोखले राहतात. या इमारतीच्या मालमत्ताकराची थकबाकी ५६ लाख रुपये दाखली आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकीदारांच्या यादीत या इमारतीचे नाव आहे. परंतु, इमारतीचा प्रश्न मालमत्ता विभागाच्या करनिर्धारक व संकलक तृप्ती सांडभोर यांच्या कालावधीत निकाली निघाला आहे. परंतु, त्यांच्या इमारतीचे नाव थकबाकीरांच्या यादीत आहेत. याबाबत संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी हात वर करत थकबाकीदारांच्या यादीशी आपला संबंध नाही. त्यासंदर्भात प्रभारी करनिर्धारक व संकलक अनिल लाड यांच्याशी संपर्क साधावा, असे गोखले यांना सांगितले. या बाबत लाड यांना गोखले यांनी विचारले असता आयुक्तांनी मला नोटीस काढण्यास सांगितले आहे, असे स्पष्ट केले. गोखले यांनी सांगितले की, थकबाकी नसताना मला केडीएमसीने नोटीस पाठवली आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)