शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाविरुद्ध मारहाणीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 22:29 IST

तीन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक संजय पांडे यांच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतांनाच आता सेनेच्याच माजी नगरसेविका शांता सोलंकी यांच्या मुलाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देमारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैदठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतिघांवर कारवाई

ठाणे : शिवसेनेच्या माजी नगरसेविका शांता सोलंकी यांचा मुलगा नरेश सोलंकी याने २० ते ३० साथीदारांना घेऊन सनी तांबे या तरुणाला लाकडी काठया आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने नरेश याच्यासह परस्परांविरुद्ध मंगळवारी सायंकाळी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील खारटन रोड परिसरात रविवारी रात्री सनी तांबे हा तरु ण उभा होता. त्यावेळी नरेश सोलंकी हा त्याच्या साथीदारांना घेऊन तिथे आला. त्याने अचानक सनी तांबे या तरु णाला लाकडी बांबु आणि काठयांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत सनीला दुखापत झाली आहे. मारहाणीच्या वेळी शांता सोलंकी या देखिल तिथे उभ्या होत्या, अशी चर्चा आहे. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. परस्पर विरोधी तक्र ार दाखल झाल्यानंतर यातील तिघांना अटक केल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली...................हवेत गोळीबारतीेन दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा निल पांडे याने आपल्या वाढिदवसानिमित्त हवेत गोळीबार केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. हा प्रकार लोणावळयातील असून ती खेळण्यातील एअर गन असल्याचे स्पष्टीकरण पांडे यांनी देऊन प्रकरणाची सारवासारव केली होती.

 

‘‘ नरेशने कोणालाही मारहाण किंवा साधा हात लावलेला नाही. उलट, सनीने किरण राठोड याला बेदम मारहाण केली. तेंव्हा सनीला मारहाण झाल्यावर नरेशने आणि मी मध्यस्थी करुन सोडविले.तर त्यांनी मारहाण केल्याचा आरोप लावला.’’शांता सोलंकी, माजी नगरसेविका, शिवसेना 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी