शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:31 IST

उपनगराध्यक्षांनीही केली तक्रार; साडेतीन कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका

डहाणू : डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यातील वाद विकोपाला गेलेले असतानाच आता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष रोहिंगतन झाईवाला यांनी सन २०१३ ते २०१६ या कालावधीत नगर परिषदेतील विविध विकासकामांच्या जमा अनामत रकमेबरोबरच बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देणे आणि अनियमित भोगवटा प्रमाणपत्र देणे याविरोधात डहाणूच्या साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पिंपळे यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली असून त्यांच्या बदलीचे संकेत मिळत आहेत.डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी यापूर्वीच्या सेवा कार्यकाळात नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामे करताना ठेकेदारांकडून निविदा प्रक्रिया संहितेनुसार कामांची विशिष्ट दराने अनामत रक्कम जमा केली होती. ही रक्कम कामे पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना न देता इतरत्र खर्च केली. सुमारे तीन कोटी ५० लाख रुपयांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा उल्लेख झाईवाला यांनी पत्रात केला आहे. तसेच भोगवटा प्रमाणपत्र आणि बांधकामात अनियमितपणा केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. १५ पैकी १२ प्रकरणांत विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन केल्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अहवालात नमूद केले आहे. पिंपळे यांच्या कार्यपद्धतीविरोधात आतापर्यंत आमदार, खासदार, तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीदेखील मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. सुरक्षा अनामत ठेव हा नगरपालिका फंडाचा भाग आहे व तो आवश्यकतेनुसार गरज पडेल तेव्हा वापर करण्याची तरतूद आहे. तसेच सर्व परवानग्या भोगवटा कायद्यानुसार दिलेल्या आहेत.- अतुल पिंपळे, मुख्याधिकारी डहाणू नगर परिषद, डहाणू