शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कर्मचा-यांवर बळजबरी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:45 IST

भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचा-यांना ते काम करत असताना बळजबरी

मीरा रोड : भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या बेकायदा मागण्यांना दाद देत नसल्याने त्याचा राग ठेवत रिलायन्स एनर्जीच्या कर्मचाºयांना ते काम करत असताना बळजबरी गाडीतून पोलीस ठाण्यात नेल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करा. कर्मचाºयांविरूद्ध दबावाखाली गुन्हा दाखल करणारे पालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत मुंबई इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनने मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढला. आठवड्याभरात कारवाई झाली नाही तर आज फक्त कांदिवली ते भार्इंदरपर्यंतच्या कर्मचाºयांनी बंद पुकारला आहे. पण नंतर सर्वच भागातील कर्मचारी कामबंद करतील. शहर अंधारात बुडाले तर त्याची जबाबदारी आमची नाही असा इशारा युनियनचे सरचिटणीस व शिवसेना उपनेते विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला.भार्इंदर पूर्वेच्या खारीगाव भागातील जुनी धोकादायक सागर इमारत पाडण्यात आली. तेथील उपकेंद्राला आग लागल्याने नागरिकांनी कळवल्यावर रिलायन्स एनर्जीचे कामगार घटनास्थळी आले. केबल बदलणे आवश्यक असल्याने ते काम सुरू केले होते. तोच सोमवारी सकाळी आमदार नरेंद्र मेहतांनी काम करणारे विक्रमसिंह जाधव, यू.डी. पाटील व दिलीप नाईक या कर्मचाºयांना बळजबरी काम बंद करायला लावत नवघर पोलीस ठाण्यात नेले. तेथून कनिष्ठ अभियंता प्रशांत जानकर मार्फत गुन्हा दाखल करायला लावला असा आरोप युनियनने केला.मंगळवारी युनियनसह अधिकारी संघटनेने कांदिवली ते भार्इंदरपर्यंतचे सर्व काम बंद ठेवत कार्यालयात सभा घेतली. तेथे नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह यांना निवेदन देऊन मेहतांवर गुन्हा दाखल न केल्यास होणाºया आंदोलनाला आम्ही जबाबदार नाही असे सांगितले. भालसिंह यांनीही चौकशी करून योग्य कार्यवाही करु असे आश्वासन दिले. नंतर महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी मेहता व जानकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या.उपनेते गायकवाड यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, युनियनचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अधिकारी संघटनेचे संजय पाटील आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्त बी. जी. पवार यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. जानकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. आयुक्तांनीही आठवड्याभरात कार्यवाहीचे आश्वासन दिले.पालिका निवडणुकीत भाजपातून ब्रिजेश सिंह हे सेनेत गेले व निवडणूक लढवली. त्याचा राग धरून मेहता हे रिलायन्स एनर्जीच्या कामगार व अधिकाºयांचा छळ करत असल्याच्या तक्रारी असल्याचे युनियनने म्हटले आहे.या शिवाय पिल्लई नावाच्या सेनेशी संबंधित व्यक्तीसोबतही ते असाच प्रकार करत आहेत. जानकर यांचे दोन भाऊ रिलायन्समध्ये कामाला असून एकाची बदली केली म्हणून जानकरला त्याचा राग असल्याचा दावाही उपस्थिांनी केला. अनेकवेळा तातडीने काम सुरु करावे लागत असल्याने आम्ही नंतर परवानगी घेतो व त्याचे शुल्कही पालिकेला देतो.या कामाबद्दल आम्ही पालिकेला शुल्क भरणार होतो व तसे दंडासह १५ लाख ८४ हजार मंगळवारी भरलेही. पण पालिका व कंपनीचा विषय असताना मेहतांनी आधीचा राग व त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने हा प्रकार केल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांनी सांगितले.