शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कंपन्यांना माणसे अन्‌ कामगारांना मिळेना काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:38 IST

नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे.

पंकज राऊत -बोईसर : कोविड-१९ विषाणूचा सर्वत्र वाढलेला प्रचंड प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक  निर्बंधांबरोबरच ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीमुळे कोरोनाचा प्रसार काहीसा नियंत्रणात   येत आहे, ही  समाधानाची बाब असली तरी जसे कोरोनाचे साईड इफेक्ट्स आरोग्यावर होतात तसेच त्याचे परिणाम बहुसंख्य उद्योगांवरही जाणवू लागले आहेत. विविध कारणांमुळे उत्पादनांचीही ‘ब्रेक द चेन’ होण्याच्या मार्गावर असल्याने  उद्योजकांची आर्थिक घडी पुन्हा रुळावरून घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. नोटबंदीनंतर  कसेतरी सावरलेले उद्योग पूर्वपदावर येत असतानाच मागील वर्षी कोरोनाचा देशात झालेल्या  आगमनानंतर सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे अचानक ठप्प  झालेले जनजीवन,  उद्योग आणि व्यवसायाने सर्वांचीच आर्थिक घडी बिघडली आहे. फेब्रुवारी, मार्चदरम्यान कोरोनाच्या  आदळलेल्या महाभयंकर दुसऱ्या  लाटेत उत्पादनात प्रचंड घट होत असल्याने उद्योजकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.कुशल मनुष्यबळाची अडचण, इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा तुटवडा, कच्च्या मालाच्या भावात झालेल्या वाढीबरोबरच वेळेवर न मिळणारा कच्चा माल, बंद असलेल्या बाजारपेठा, मूळगावी परतलेले परप्रांतीय कामगार, स्थानिक कामगारांमध्ये असलेली संसर्गाची भीती, इम्पोर्ट व  एक्सपोर्टच्या माल वाहतुकीवर  झालेला परिणाम, अवजड मालाची चढ-उतार करण्याकरिता मजुरांची कमतरता, कच्चा व पक्क्या मालाचा वाहतुकीवर झालेला परिणाम व  मंदावलेली वाहतूक व्यवस्था,  यंत्रसामग्री (मशिनरी)ची देखभाल (मेन्टेनन्स ) दुरुस्तीदरम्यान  वेळेवर स्पेअर पार्ट्स उपलब्ध होत नसल्याने बंद पडणारी मशिनरी, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या  भीतीने  कामगारांच्या अनुपस्थितीचे वाढलेले प्रमाण, ऑर्डर आहे, परंतु नियोजित वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे पार्टी जाण्याची टांगती तलवार अशा अडचणींमुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांमधील उत्पादनावर गंभीर  परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास त्याच्या दूरगामी परिणामाला उद्योजकांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

विविध क्षेत्रांवर गंभीर परिणामजिल्ह्यामध्ये तारापूर, पालघर, वसई, वाडा येथे औद्योगिक क्षेत्र असून लहान-मोठे सुमारे साडेतीन हजार उद्योग आहेत. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी कडक निर्बंध सुरू असल्याने याचा उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे.

 कुशल कामगारांच्या तुटवड्याबरोबरच वेळेवर उपलब्ध न  होणारा कच्चा माल आणि कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था, कोरोनाचे सावट इत्यादी अनेक अडचणींमुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होत असल्याने  नियोजित वेळेत व  ठरलेल्या किमतीमध्ये पक्क्या मालाचा पुरवठा करण्याकरिता तारापूर येथील उद्योजकांना अनंत अडचणी येत आहेत.  - डी .के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

आम्ही अकुशल कामगार असून सध्या तारापूर एमआयडीसीमध्ये आम्हाला रोज काम मिळत नसल्याने नाका कामगारांप्रमाणे उभे राहण्याच्या ठिकाणी प्रतीक्षा करून घरी परतावे लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या चिंतेत आम्ही आहोत? - विजय गौरा, कामगार 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस