शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

शौचालयांसाठी मोक्याच्या जागांची वाटणार खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:38 IST

नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष : १५ वर्षांसाठी देणार जाहिरातींचे हक्क

ठाणे : ठाणेकरांना सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे नवे कुरण तयार करण्याच्या हालचाली पालिकेत सुरु झाल्या आहेत. सुमारे चार हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडणारी पालिका पाच-दहा लाख रुपयांच्या शौचालयांसाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जागा संस्थांना दान देणार आहे. शौचालयाची सुविधा देण्याच्या मोबदल्यात या संस्थांना पालिकेच्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याची मुभा मिळणार आहे.

दररोज बाहेरुन ठाण्यात येणाऱ्या आणि ठाण्यातून बाहेर जाणाºयांची संख्या थोडीथोडकी नाही. दररोज लाखो लोकांची येजा असलेल्या ठाण्यात सार्वजनिक शौचालयांची सुविधा असणे निश्चितच क्रमप्राप्त आहे. सुमारे चार हजार कोटी रुपयांचे बजेट आणि हजारो सफाई कामगारांचा ताफा दिमतीला असलेल्या पालिकेसाठी सार्वजनिक शौचालये बांधणे फारशी मोठी बाब नाही. मात्र लोकांची गरज पूर्ण करण्याच्या नावाखाली पालिकेने मोक्याच्या जागांची खिरापत वाटण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

सार्वजनिक शौचालयांच्या मुद्यावर मे. सॅन अ‍ॅड्स यांनी पालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून महासभेसमोर मांडला जाणार आहे. या प्रस्तावानुसार शौचालयांसाठी पालिका जागा उपलब्ध करुन देणार आहे. शौचालयांच्या बांधकामाचा खर्च, वीज, पाणी आणि मनुष्यबळसुध्दा संस्थाच पुरवणार आहे. त्यासाठी जागा ठाणे पालिका उपलब्ध करुन देणार आहे. शौचालय उभारणीसाठी तळमजल्यावर ८०० चौरस फूट जागा, तसेच पार्कींग व इतर सुविधांसाठी अंदाजे ६० बाय ३० क्षेत्रफळ पालिका उपलब्ध करुन देणार आहे. तळमजल्यावर शौचालय, तर पहिल्या मजल्याचा व्यवसायिक वापर करण्याची मूभा संस्थेला राहणार आहे. या शौचालयासाठी वीज, पाणी, मनुष्यबळ, साफसफाई आदींचा खर्च संस्थाच करणार आहे. त्या मोबदल्यात शौचालयावर १५ वर्षांकरीता जाहीरातीचे हक्क संस्थेला प्रदान केले जाणार आहेत. काही कारणास्तव शौचालयाच्या ठिकाणी संस्थेला जाहिरातीसाठी पूरक जागा मिळाली नाही, तर इतरत्र जागा पालिकाचा उपलब्ध करुन देणार आहे.

ठाण्यातील जागेच्या किमती कुणालाही सांगण्याची गरज नाही; मात्र सार्वजनिक शौचालयांच्या नावाखाली मोक्याच्या जागा संस्थेला देत असताना पालिकेला मात्र त्यातून दमडीही मिळणार नाही. आता महासभा या मुद्यावर काय भूमिका घेते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.यापूर्वी पालिकेला मिळायचे उत्पन्नशहरातील शौचालये सुस्थितीत राहावीत, यासाठी यापूर्वीही पालिकेने करार केले आहेत. मोबाइल कंपन्यांना शौचालयावर टॉवर उभारण्याच्या मोबदल्यात शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेने यापूर्वी दिली आहे. तशा निविदासुध्दा काढण्यात आल्या आहेत.आता शौचालये उभारा, देखभाल करा आणि १५ वर्षांसाठी जाहीरात करण्याची संधी मिळवा असा प्रस्ताव नव्याने पटलावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका