शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवास्तव वीजबिलांबाबत महावितरणला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 02:33 IST

आठ दिवसात मागवले स्पष्टीकरण : आमदार निरंजन डावखरे यांची माहिती

ठाणे : ठाणे, मुलुंड-भांडुपसह राज्यातील विविध भागांतील ग्राहकांना देण्यात आलेल्या अवास्तव वीजबिलांबाबत महावितरण कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) नोटीस बजावून आठ दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण मागवल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायकारक वीजबिलांविरोधात भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी एमईआरसीकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकार व महावितरणविरोधात तक्रार करून वीजदरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची मागणी केली आहे.

या दरवाढीतून अनेक व्यावसायिक व घरगुती ग्राहकांवर अन्याय होत असल्याकडे आयोगाचे लक्ष वेधण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले भरण्यासाठी सहा महिने मुदतवाढ द्यावी. या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी, आदी मागण्याही केल्या आहेत. त्याची दखल घेत ही नोटीस महावितरणला देण्यात आल्याचा दावा डावखरे यांनी केला आहे. राज्यातील ग्राहकांना चुकीची वीजबिले दिली की, लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही आर्थिक घडामोडी नसताना अवास्तव बिले का देण्यात आली, आदी मुद्द्यांवर या नोटीसद्वारे स्पष्टीकरण मागविले आहे, अशी माहिती डावखरे यांनी दिली.ग्राहकांनी बिलांची छायाचित्रे व तक्रारी पाठवाव्याठाणे महापालिका क्षेत्रातील हजारो नागरिकांना जादा वीजबिले पाठविण्यात आली आहेत. या बिलांची छायाचित्रे व आपल्या तक्रारी पाठवाव्या. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कंपनीकडे पोहोचवून न्याय मिळवून दिला जाईल, असे आवाहन डावखरे यांनी केले आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईelectricityवीज