शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयाचा प्रारंभ १ ऑक्टोबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:59 IST

हालचालींना वेग : प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्यांसाठीही जागेची शोधाशोध सुरू

मंगेश कराळे।लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मिरा-भार्इंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला, पण अद्याप नोटिफिकेशन निघालेले नसून लवकरच निघणार असल्याचे कळते. पोलीस आयुक्तालय कधीपासून सुरू होणार, अशी पोलिसांबरोबरच सामान्यांमध्येही चर्चा सुरू आहे. या पोलीस आयुक्तालयात समावेश होणाऱ्या पोलीस ठाण्यांतून गुन्ह्यांसंदर्भात माहिती गोळा करून डेटा बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. तर प्रस्तावित पोलीस ठाणी, डीसीपी, एसीपी कार्यालयांसाठी जागेची पाहणी किंवा भाडेतत्त्वावर घेण्याची सुरुवात झालेली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाचा शुभारंभ १ आॅक्टोबरला होण्याची दाट शक्यता आहे.वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यातून हत्या, हत्येचे प्रयत्न, दरोडे, जबरी चोºया अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती तसेच मनुष्यबळ, दुचाकी आणि चारचाकी वाहन संख्या आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक उपकरणे मागवून डेटा बनविण्याची सुरुवात झाली असल्याचेही कळते. मिरा रोडमध्ये महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेले कार्यालय १ आॅक्टोबरला सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.वसई तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नवनियुक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी याच विभागात आपले लक्ष केंद्रित केले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या शहरातील पोलीस ठाण्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात ते भेटी देऊन भौगोलिक आढावा घेऊन माहिती गोळा करत आहे. तसेच त्यांनी राहण्यासाठीही वसईची निवड केली असून ते रोज या ठिकाणाहून मिरा रोड येथील आयुक्तालयात रोज ये-जा करणार आहेत. दरम्यान, परिमंडळ-१ मध्ये सध्याचे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची डीसीपी म्हणून वर्णी लागणार असल्याची आणि परिमंडळ-२ येथे नवनियुक्त आयपीएस दर्जाचे अधिकारी डीसीपी म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. राजकुमार शिंदे नावाचे वरिष्ठ अधिकारी डीसीपी म्हणून येणार असल्याचेही बोलले जात आहे.१४ वाहने लवकरचहोणार दाखलनवीन पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाबाबत जोरदार हालचाली सुरू असून मीरा-भार्इंदर येथील पोलीस ठाण्यासाठी ७ आणि वसई-विरार येथील पोलीस ठाण्यासाठी ७ अशी १४ चारचाकी वाहने ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील १४ पोलीस वाहनचालकांना पुणे येथे पाठविण्यात आले आहे.अशी असणार रचनानवीन पोलीस आयुक्तालयाची तीन परिमंडळांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. पहिल्या परिमंडळात मीरा रोड, काशिमीरा आणि भार्इंदर, दुसºया परिमंडळात वसई आणि नालासोपारा तर तिसºया परिमंडळात तुळिंज आणि विरार यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण आयुक्तालयात पाच डीसीपी, ८ ते ९ एसीपी, ७२ पोलीस निरीक्षक असणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिस