शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोडपट्यांचा होणार कायापालट, रंगरंगोटीसह मुलभुत कामे करण्याचे आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:47 IST

इंदिरा नगर भागातील झोपडपट्यांना रंगरंगोटीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दिल्यानंतर सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा पारसिक रेतीबंगर परिसरातील झोपडपट्यांकडे वळविला आहे. आता या भागातील झोपडपट्यांचाही याच पध्दतीने कायापालट केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देइतर सुविधा पुरविण्याचेही आयुक्तांचे आदेशस्मशानभुमीचा प्रश्नही निघाला निकाली

ठाणे - पारसिक रेतीबंदर परिसरातील ८ झोपडपट्ट्यांचा कायापालट होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सोमवारी सकाळी या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिसाल मुंबई या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आठही झोपडपट्टयांची आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच या ठिकाणी मुलभूत कामे करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महत्वाचे म्हणजे या परिसरात स्मशानभूमीचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबरपासून या कामांना सुरूवात होणार आहे.                    यावेळी मिसाल मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा रूबल नागी, स्थानिक नगरसेविका अनिता किणी, नगरसेवक राजेंद्र साप्ते, समाजसेविका ऋता आव्हाड आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या परिसराची पाहणी करून कोणत्या गोष्टी प्राधान्याने करावयाच्या आहेत याचा आढावा आयुक्तांनी घेतला. यामध्ये जुना गवळी पाडा येथे मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, शौचालयाचे कनेक्शन, विद्युत पोल बसविणे, कल्व्हर्ट बांधणे, नाल्याची भिंत बांधणे, मोबाईल हेल्थ सेंटर उपलब्ध करून देणे आदी सुविधा देण्याबाबत कार्यकारी अभियंत्यास आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे राणा नगर-जुना गवळी पाडा येथील दत्त मंदीरासमोर ओपन जिम तयार करणे, शाळेवर वर पत्रे बसविणे, या परिसरात पुरेसा पाणी पुरवठा करणे, विद्युत पोल बसविणे, कचरा कुंड्या बसविणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी जावून कचरा गोळा करणे, नाल्याचे बांधकाम करणे, शिवाजी नगर भागात नाल्यांची साफसफाई, दुरूस्ती, शौचालयास पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणे, स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून शौचालयाची साफसफाई करणे त्याचप्रमाणे पंजाबी कॉलनी, आदर्श वसाहत, गौतम नगर, राम वाडी या परिसरात नालेसफाई, नाले खोल करणे व गटारे साफ करणे आदी कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच रेतीबंदर नुतन मैदान ४ नंबर या ठिकाणी स्मशानभूमीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच येथील कल्व्हर्टची नियमित साफसफाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.             गेल्या ४० वर्षांपासून या ठिकाणी लोकांची वस्ती आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने या झोपडपट्टीला कधी भेट दिली नाही. परंतु संजीव जयस्वाल हे पहिले आयुक्त आहेत की त्यांनी या झोपडपट्टीला भेट देवून तेथील मुलभूत कामे करण्यास प्राधान्य दिल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त