शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या आरोपांना आयुक्त देणार उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:25 IST

शहरात नालेसफाई होत नसल्याचा झालेला आरोप, फेरीवाल्यांच्या कारवाईआड सहायक आयुक्त हप्ते घेत असल्याची नगरसेवकांनी केलेली ओरड आणि एकूणच प्रशासनाच्या कारभारावर घेतलेला आक्षेप यावरून बुधवारची महासभा चांगलीच चर्चेत राहिली.

ठाणे : शहरात नालेसफाई होत नसल्याचा झालेला आरोप, फेरीवाल्यांच्या कारवाईआड सहायक आयुक्त हप्ते घेत असल्याची नगरसेवकांनी केलेली ओरड आणि एकूणच प्रशासनाच्या कारभारावर घेतलेला आक्षेप यावरून बुधवारची महासभा चांगलीच चर्चेत राहिली. परंतु, आता या सर्वांचा समाचार घेण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या महासभेत आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: हजर राहणार असल्याने या सर्वांची उत्तरे देण्याबरोबरच नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. शुक्रवारच्या महासभेत अनेक महत्त्वाचे आणि चुकीचे विषय मंजुरीसाठी पटलावर आले असल्याने नगरसेवक आता आयुक्तांसमोर आक्रमक भूमिका घेणार की नांगी टाकणार, असा सवालही आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अनुपस्थितीत फेरीवाल्यांच्या मुद्यावरून सहायक आयुक्तांचा हप्तेखोर असा उल्लेख करणाºया लोकप्रतिनिधींना या महासभेत आयुक्त स्वत: उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एरव्ही सभागृहात प्रशासनाविरोधात बोलणारे लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर आक्र मक होण्याची हिम्मत दाखवणार का, हे स्पष्ट होईल.बुधवारी झालेल्या महासभेत फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. नऊ प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त फेरीवाल्यांवर करवाई करत नसून ते सर्व हप्तेखोर असल्याचा उल्लेख भर महासभेत ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला होता. त्यानंतर, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात फेरीवाल्यांवर करवाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.आजच्या महासभेला जयस्वाल राहणार उपस्थितफेरीवाल्यांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप महासभेत सदस्यांनी केला होता. नगरसेवकांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती.शुक्रवाराच्या महासभेत आयुक्त जयस्वाल स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता असून नगरसेवकांच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका