शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:57 IST

एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच

ठाणे : एकीकडे महासभेला दांडी मारणाऱ्या अधिका-यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि पालिका प्रशासनात शीतयुद्ध पेटले असतानाच, आता ठाण्यातील दक्ष नागरिकांनीही दांडीबहाद्दर अधिका-यांचा निषेध करून सोमवारी ठामपा मुख्यालयाजवळ आंदोलन केले. आयुक्तांनी महापौरांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.गेल्या आठवड्याच्या महासभेत महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरून अधिकाºयांनी कुटुंबासमवेत या रेंटलच्या घरात राहून दाखवावे, असे आव्हान दिले होते. परंतु, वेळेअभावी ती महासभा तहकूब झाल्याने लागलीच दुसºया दिवशी महापौरांनी महासभा लावली. परंतु, तिला सचिवांव्यतिरिक्त एकही अधिकारी फिरकला नाही. सर्व अधिकाºयांनी दांडी मारली होती. मार्चअखेर असल्याने आयुक्तांनी आधीच बैठक लावल्याचे कारण महासभेला दिले होते. परंतु, आता या मुद्यावरून महापौर विरुद्ध प्रशासन असे शीतयुद्ध रंगले असतानाच त्यात ठाण्यातील दक्ष नागरिक उन्मेष बागवे यांनीदेखील उडी घेतली. सोमवारी त्यांनी प्रशासनाचा निषेध करून मुख्यालयाच्या गेटवर आंदोलन केले. महापौरांनी बोलवलेल्या महत्त्वाच्या सभेत अनुपस्थित राहून आयुक्तांनी व अन्य अधिकाºयांनी महापौरांचा अपमान केला आहे. त्यांचा अपमान म्हणजे शहरातील प्रथम नागरिकाचा म्हणजेच प्रत्येक ठाणेकराचा अपमान आहे. दुर्दैवाने नगरसेवकही प्रशासनाला खुलेपणाने विरोध करायला घाबरत आहेत, असा सर्वांचा अनुभव आहे. आयुक्तांनी महासभेत उपस्थित न राहणे हा आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा अपमान असून अनेकदा असे घडले आहे. अधिकारी येतात आणि जातात, त्यांना आम्ही दिलेल्या करातून पगार दिला जातो. या शहरात लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. ते सर्व या प्रकारांवर गप्प का?