शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Bhiwandi: भिवंडी महापालिकेचा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजारांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी केला सादर 

By नितीन पंडित | Updated: March 20, 2023 18:20 IST

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महानगरपालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ११ कोटी ६२ लाख शिल्लक दर्शविणारा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभाग प्रमुखांच्या प्रशासकीय समिती समोर मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला.

- नितीन पंडित भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ११ कोटी ६२ लाख शिल्लक दर्शविणारा ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विभाग प्रमुखांच्या प्रशासकीय समिती समोर मनपा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,मुख्य लेख व वित्त अधिकारी किरण तायडे,उपायुक्त मुख्यालय दीपक पुजारी,उपायुक्त दीपक झिंजाड,उपायुक्त प्रणाली घोंगे, सर्व विभाग प्रमुख पालिका अधिकारी उपस्थित होते.

भिवंडी महापालिकेचा सन २०२२-२३ चे सुधारीत ८८७ कोटी ६४ लाख २० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.तर २०२३-२४ मध्ये महानगरपालिकेची अंदाजित प्रारंभिक शिल्लक १७ कोटी १६ लाख ८५ हजार अपेक्षित धरून एकुण उत्पन्न प्रारंभिक शिल्लकेसह ८९७ कोटी ६९ लाख ६३ हजार अपेक्षित धरून ११ कोटी ६२ लाख शिल्लकेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात विशेष करून मलनिसारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी प्लँट कार्यान्वीत करणे,शहरात स्मशानभुमी मध्ये गॅस दाहीनीची सुविधा उपलब्ध करून देणे,पालिकेचा ३० खाटांचा बीजीपी दवाखाना कार्यान्वीत करणे,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची निगा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे,सिमेंट कॉक्रिट रोड तयार करणे,अटल आनंद घन वन प्रकल्प,कै.परशुराम धोंडु टावरे स्टेडीअम क्रिडा संकुलन सुशोभिकरण करणे,मनपा शाळा इमारती बळकटीकरण करणे व बेंचेस पुरविणे,स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करणे,सौर ऊर्जा प्रकल्प,नगरसेवक निधीसाठी ९कोटी ७० लाख ८८ हजारांची तरतूद या अर्थसंकल्पात करणेत आली आहे.तसेच महिला व बाल कल्याण,दुर्बल घटक,दिव्यांग कल्याण साठी ३२कोटी ८८ लाख रुपयांचा निधीची तरतूद केली असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी लवकरच पाण्याच्या टाक्या वापरात आणण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याची माहिती मनपा आयुक्त म्हसाळ यांनी दिली आहे.

तर सन २०२२-२३ मध्ये मनपा शाळांची दुरुस्ती,अग्निशमन विभागाकरीता अत्याधुनिक वाहने तसेच अत्याधुनिक गणवेश व साधन सामुग्री खरेदी करण्यात आली असून,नाना नानी पार्क येथे बॅडमिंटन कोर्ट बांधकाम,रस्त्यांचे काँक्रेटीकरण,बी.जी.पी. रुग्णालय इमारतीचे बांधकाम व चार नागरी आरोग्य केंद्र बांधकाम,दिव्यांग लाभार्थीना आर्थिक सहाय,दिव्यांग विद्यार्थी सहाय्य,कोरोना काळात अनाथ झालेल्या २३ बालकांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे अर्थसहाय्य,४८ लाभार्थीना बेकरी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण,६० लाभार्थीना अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण,५१ लाभार्थीना संस्कार भारती रांगोळी काढणेचे प्रशिक्षण,५१ लाभार्थीना पेपर बॅग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती आयुक्त म्हसाळ यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे