शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिलाई मशीन खरेदी घोटाळा प्रकरणी आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:44 IST

बाजारात ६८०० रुपयांची मिळणारी मशिन पालिकेने ११ हजार ६०० ला खरेदी केली.

मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुर्वीच्या धोरणाला परस्पर तिलांजली देतानाच बाजार भावा पेक्षा जास्त दराने महिला बालकल्याण समितीने शिलाई मशीन खरेदी केल्याचा प्रकार वादग्रस्त ठरला आहे. गंभीर बाब म्हणजे ठेकेदाराचा शिलाई मशिन वितरणाचा व्यवसाय नसताना ठेका दिले गेला. आता या प्रकरणी अखेर महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून नोटीस बजावून संबंधितांना खुलासा सादर करण्यास सांगीतले आहे.गरीब - गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणुन शिलाई मशीन खरेदीचा ठराव झाल्या नंतर निविदा प्रक्रिया होऊन ३० आॅगस्ट रोजी मशिन खरेदीचे कार्यादेश श्री साई श्रद्धा महिला संस्थेला दिले. उषा कंपनीच्या मार्वेला मॉडेलच्या १७० मशीन खरेदीसाठी प्रती मशिन ११ हजार ६०० रुपये ठेकेदारास अदा केले गेले. त्यासाठी साडे एकोणीस लाख रुपये खर्च होता.वास्तविक पूर्वी पासून समितीच्या ठरलेल्या धोरणा नुसार प्रत्येक नगरसेवकास त्याच्या प्रभागात एक मशिन गरजु महिलेस वाटप करण्यास दिली जाते. पालिकेत ९५ नगरसेवक असताना मशिन खरेदी मात्र तब्बल १७० केल्या गेल्या. बहुतांश नगरसेवकांना प्रत्येकी एक शिलाई मशिनच देण्यात आली असताना महापौर डिंपल मेहतांनी मात्र ५० पेक्षा जास्त मशिन मागुन घेत वाटल्या. विधानसभा निवडणुक असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने जास्त मशिन खरेदी करुन केला गेल्याचा आरोप केला गेला.बाजारात ६८०० रुपयांची मिळणारी मशिन पालिकेने ११ हजार ६०० ला खरेदी केली. आॅनलाईन विक्रीची किरकोळ किंमत ७ हजार २००च्या घरात होती. मशिनच्या पॅकिंग खोक्यावर देखील सर्व करांसहितची किरकोळ छापील किंमत ९ हजार ८५० इतकी होती. त्यामुळे सदर मशिन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका कुसुम गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.विशेष म्हणजे ज्या ठेकेदारास मशिन पुरवठ्याचे कंत्राट दिले त्यांचा सकस आहार, गणवेश, स्टेशनरी, ज्वेलरी मेकिंग चा व्यवसाय असल्याचे नमुद आहे. त्यामुळे पालिकेने सदर मशिन खरेदीसाठी थेट उषा कंपनी व वितरकां कडुन देखील दर का मागवले नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सदर मशिन खरंच मुळ कंपनीची आहे की एसेंबल केलेली आहे ? अशी शंका देखील पुर्वीचा पालिका अनुभव पाहता केली जात आहे.त्या अनुषंगाने आयुक्त बालाजी खतगावकर यांनी निवड समितीतल्या सदस्यांसह संबंधित विभागास नोटीस बजावून सदर मशिन खरेदी प्रकरणी खुसाला सादर करण्यास सांगितले आहे. महिला बालकल्याण विभागाचे लिपीक यांना देखील शिलाई मशिन प्रस्ताव व निवीदा तुमच्या मार्फत सादर केल्याने खुलासा देण्यास आयुक्तांनी नोटीसीत नमुद केले आहे. त्यामुळे विभागासह निवड समिती या प्रकरणी काय खुलासा देते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणी चौकशीचे आदेश देत अतिरीक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणे