शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लेटलतिफ कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी घेतली झाडाझडती, केडीएमसीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:02 IST

राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. सोबतच दररोजच्या कामाची वेळ वाढवली आहे.

कल्याण : राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. सोबतच दररोजच्या कामाची वेळ वाढवली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली असताना, अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे आयुक्तांनी बुधवारी केलेल्या आकस्मिक भेटीतून उघड झाले आहे. जे कर्मचारी उशिरा आले, त्यांचे हाफ डे लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पालिकेचे जवळपास ३0 टक्के कर्मचारी वेळेत त्यांच्या कामावर हजर नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिका मुख्यालयात बुधवारी कामाची वेळ सुरू होण्यापूर्वीच आले. नियमानुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात सकाळी ९.४५ वाजता हजर राहणे आवश्यक आहे. नेमक्या त्याचवेळी आयुक्तांनी विविध खात्यांत जाऊन पाहणीला सुरुवात केली. त्यावेळी अनेक खात्यांतील कर्मचारी व अधिकारी कामावर हजर झालेले नव्हते. अन्य विभागांमध्ये ही वार्ता पसरताच सगळ्यांची एकच पळापळ झाली.आयुक्तांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना शिस्त व सुप्रशासनावर भर देण्याची ग्वाही दिली होती. अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत कार्यालयात हजर राहणे, हा शिस्त आणि सुप्रशासनाचा एक भाग आहे. ज्या खात्यांमध्ये अधिकारी, कर्मचारी वेळेवर आले नव्हते, त्यांचे वेळेवर न येण्याचे कारण सबळ असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, जे विनाकारण उशिरा आले, त्यांचा हाफ डे लावण्याचे आयुक्तांनी सूचित केले आहे.अनेक अधिकारी साइट व्हिजिटच्या नावाखाली परस्पर घरी निघून जातात. सोमवारी आयुक्तांची आढावा बैठक असते. काही अधिकारी तर मुख्यालयाचे तोंड केवळ या आढावा बैठकीच्या दिवशीच पाहतात. अनेक अधिकारी स्थायी समितीच्या बैठकीसही वेळेवर येत नाही, तसेच महासभेलाही अनुपस्थित राहतात. त्यामुळे त्यांच्या खात्याशीसंबंधित एखादा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याचे उत्तर सदस्याला मिळत नाही. अशा सर्वच मुद्यांवर आयुक्तांकडून आता समाचार घेतला जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका