शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आयुक्त, सेना, राष्ट्रवादीचा धोबीपछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:01 IST

भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर चर्चा घडवून आणायची नाही आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची खंबीरपणे पाठराखण करायची ही भूमिका निश्चित करण्याकरिता

ठाणे : भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर चर्चा घडवून आणायची नाही आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची खंबीरपणे पाठराखण करायची ही भूमिका निश्चित करण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत खलबते करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्या बैठकीत ठरल्यानुसार मुंब्रा येथील स्टेडियमच्या विषयावरुन वाद उकरून काढण्यात आला व भाजपाचा डाव फसला.भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी प्रशासनाविरोधात मांडलेल्या भल्या मोठ्या सभा तहकुबीवर चर्चा होणार हे स्पष्ट दिसत होते आणि पाटणकर यांच्या बाजूने किती नगरसेवक बोलतील, याचा अभ्यास दोन दिवस अगोदर सुरू होता. या सभा तहकुबीवर चर्चा झाली तर प्रशासन अडचणीत येऊ शकते, असा कयास लावला जात होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या तहकुबीवर चर्चा होऊ द्यायची नाही आणि महासभा सात वाजेपर्यंत रेटून नेण्याचे प्लॅनिंग सोमवारी रात्री झाले.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेला सेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आयुक्तांविरोधात आवाज उठवणाºया महापौर मीनाक्षी शिंदे यांना यावेळी ‘कानमंत्र’ देण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.आयुक्तांशी पालकमंत्र्यानी काही चर्चा केली. त्यांना आश्वासन देण्यात आले. पालिकेच्या महासभेची वेळ साडेअकराची असली तरी बहुतांश वेळा ती दुपारी १ वाजेपर्यंत सुरु होते. मंगळवारी महासभा वेळेत सुरू झाली. काही सदस्यांना महासभा नेहमीप्रमाणे उशिरा सुरु होईल, असे वाटत असल्याने ते उशिरा आले. साहजिकच शिवसेनेचे सदस्य ठरल्यानुसार वेळेवर हजर होते. शिवसेनेची पहिली खेळी यशस्वी झाली. गणसंख्येअभावी सभा तहकूब झाली. एकदा सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभा तहकुबी मांडून चर्चा शक्य नव्हती. पुन्हा महासभा सुरू होताच पाटणकर यांनी सभा तहकुबी रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला राष्टÑवादी धावून आली. मुंब्य्रातील स्टेडिअमचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सभा लांबवली. याच गोंधळात विषयपत्रिका पुकारुन पाटणकर यांच्या तहकुबीला तिलांजली दिली.