शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तालयातील कमांडोंची फोर्स वन प्रशिक्षणात बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 23:31 IST

मंबईच्या फोर्स वन ने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

ठळक मुद्देजलद प्रतिसाद पथकाला मिळाला बेस्ट हिटचा किताबस्टार आॅफ द कोर्सचा पुरस्कार ज्योतीराव पोळने पटकविला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मंबईच्या फोर्स वन ने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर स्टार आॅफ द कोर्सचा पुरस्कार ज्योतीराव पोळ या कमांडोने पटकविला.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील जलद प्रतिसाद पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी तसेच कमांडोंचे मनोधैर्य उंचावण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येकी २१ दिवसांच्या खडतर अशा चिता कोर्सचे आयोजन केले जात आहे. या कोर्सच्या दरम्यान कमांडोंना शारिरीक व्यायामाबरोबरच मनोधैर्य वाढविण्याचे प्रशिक्षण विविध तज्ज्ञांमार्फत देण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थीना सकस आहार, प्रथमोपचार आणि स्फोटके अशा प्रकारचे कॅप्सूल कोर्सचेही आयोजन केले आहे. याच कोर्सच्या प्रभावी आयोजनामुळे मुंबईच्या फोर्स वन यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ते १९ फेब्रुवारी या दरम्यान घेतलेल्या मूल्यमापन परीक्षांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची ७५ टक्के कामगिरी उत्कृष्ठ असल्याचे आढळले.त्यानंतर २२ मार्च २०२१ ते ३ एप्रिल दरम्यान फोर्स वन मुंबई येथे संपूर्ण महाराष्टÑातील जलद प्रतिसाद पथकांसाठी उजळणी कोर्स सत्र चारचे आयोजन केले होते. जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहर अंतर्गत चिता कोर्स आणि कॅप्सूल कोर्समधील परीक्षांमध्ये पाच पैकी चार अशी ८० टक्के पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले.* अशी आहे कामगिरी-बेस्ट पीपीटी - पोलीस अंमलदार प्रदीप भोयेबेस्ट बीपीईटी- पोलीस अंमलदार प्रदीप भोयेस्टार आॅफ द कोर्स - पोलीस अंमलदार ज्योतीराव पोळ आणि बेट हिटचे पारितोषिक जलद प्रतिसाद पथक, ठाणे शहर यांनी प्राप्त केले.* विशेष म्हणजे एकूण सात जलद प्रतिसाद पथकांमध्ये ठाणे शहर यांनी ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वीतीय सोलापूर जलद प्रतिसाद पथकाने - ७४.७१ टक्के तर नवी मुंबईने ७५.१४ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.* पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) प्रविण पवार आणि पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि मनोधैर्य उंचविण्यासाठी या जवानांना मार्गदर्शन करणारे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी या पथकाचे विशेष अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस