शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध भिलारवर चढले ‘पुस्तकाच्या गावा’चे रंग

By admin | Updated: April 21, 2017 00:00 IST

पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे घरांच्या भिंतीवर साकारली... वाचनानंद घेण्याचे संदेश दर्शनी भागात झळकले... लेखक, ग्रंथकार यांची चित्रे अक्षरश: जिवंत झाली...

ठाणे : पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे घरांच्या भिंतीवर साकारली... वाचनानंद घेण्याचे संदेश दर्शनी भागात झळकले... लेखक, ग्रंथकार यांची चित्रे अक्षरश: जिवंत झाली...स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार गाव अवघ्या ३६ तासांत रंगात भिजले आणि ‘पुस्तकांचे गाव’ अशी नवी ओळख सांगू लागले.तब्बल ७५ नामवंत कलाकारांनी २५ घरांवर ११ हजार चौ. फूट चित्रे काढून ही किमया केली. त्यामध्ये ४० कलाकार हे ठाण्यातील होते. गाव रंगवण्याच्या या कामात गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. महाराष्ट्र शासनाच्या ‘पुस्तकांचे गाव’ या उपक्रमासाठी मराठी भाषा विकास संस्थेने पर्यटन नकाशावरील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची निवड केली होती. मराठी भाषा आणि वाचनसंस्कृती वाढावी, या उद्देशाने गावातील काही घरांमध्ये एकेका विषयानुरूप पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. आलेल्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. या सर्व घरांना त्यांच्या साहित्यिक विषयानुरूप ओळखता यावे, याकरिता भिलार गावातील २५ घरे रंगवण्याचा निर्णय झाला. नेहमीप्रमाणे पाट्या न लावता घराची भिंतच चित्रमय झाली, तर दुरूनही ती दृष्टीला येईल, अशी कल्पना पुढे आली आणि मग कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रातील कलाकारांना व्हॉट्सअ‍ॅप संदेश ‘स्वत्व’ संस्थेने पाठवले. त्याला शंभरहून अधिक कलाकारांनी प्रतिसाद दिला. विजयराज बोधनकर, महेश आंजर्लेकर, शशिकांत झगडे, चंद्रकांत हुळवळे, रवी चव्हाण, हंसोज्ञेय तांबे, अमेय म्हात्रे, सुधीर उदगीरकर आणि सदाशिव कुलकर्णी हे ज्येष्ठ व्यावसायिक कलाकार आणि कलाशिक्षक स्वत:हून या उपक्र मात सहभागी झाले. ७५ कलाकारांच्या संचासह ‘स्वत्व’चे कार्यकर्ते १४ तारखेला भिलार येथे पोहोचले आणि हा उपक्रम पूर्णत्वास नेला. विविध व्यावसायिक, गृहिणी, रचना संसदचे २० आणि अ‍ॅमिटीचे कला विद्यार्थी यांनीही या उपक्रमास हातभार लावला.भिलार ग्रामस्थांचा प्रेमळ पाहुणचार, उपक्रमाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आपलेपणा थक्क करणारा होता, असे कलाकारांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य भाषा संवर्धन संस्थेकडून या उपक्र माला संपूर्ण सहकार्य लाभले. ‘स्वत्व’च्या अ‍ॅड. स्वाती दीक्षित आणि आर्किटेक्ट श्रीपाद भालेराव यांनी विनोद शर्मा यांच्यासह नियोजन केले. ही ‘पुस्तकांचे गाव योजना’ नक्कीच यशस्वी होईल, अशी आशा ‘स्वत्व’ने व्यक्त केली. (प्रतिनिधी)