शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील भास्कर काॅलनीच्या रस्त्याजवळील अवाढव्य हाेल्डींग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याना साकडे!

By सुरेश लोखंडे | Updated: June 5, 2024 17:21 IST

भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे.

ठाणे : येथील नाेैपाडा परिसरातील भास्कर कॉलनीच्या भर वस्तीत सिताराम भुवन या जुन्या इमारतीत फ्लड लाइट्स लावलेले आवाढव्य जाहिरात फलक (हाेल्डींग) व त्यावरील माेठमाेठ्या लाईटमुळे परिसरात उष्णतामान वाढवले जात आहे. हा प्रखर प्रकाश रहिवाशांच्या घरात येत असल्याने त्यांना त्रास होतो. याशिवाय या हाेल्डींगमुळे घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती हाेण्याची भीती व्यक्त करून येथील हाऊसिंग साेसायटींमधील रहिवाश्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करून हाेल्डीग हटवण्याची मागणी रहिवाश्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह ठाणे महापालिका आयुक्तांकउे केली आहे.

             भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्याचा आकार अंदाजे ४० फूट ४० फूट असल्याचा आंदाजही या रहिवाश्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. या हाेल्डींगच्या इमारतीजवळ हॉटेल, पानाचे दुकान, टायरवाला व सर्विस रोड हा सतत मोठ्या वर्दळीचा परिसर आहे. या भर नागरी वस्तीमध्ये अवाढव्य होर्डिंगच्या जाहिरातींबोर्डवर तब्बल वीस हाय पावरचे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत. त्यामुळे परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. परिसरातील लगतच्या सर्व इमारतीमधील रहिवाशांना प्रखर प्रकाश घरात येत असल्याने त्यांना भयानक त्रास होत आहे. याशिवाय आगामी वादळी पावसादरम्यान घाेटकाेपरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठी घटना होण्याची भीती रहिवाश्यांनी व्यक्त करून तत्काळ हाेल्डीग हटवण्याची मागणी लावून धरली आहे.            या अवाढव्य हाेल्डींगमुळे दुर्दैवी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्त हानी होण्याचा संभव आहे. त्यास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हाेल्डींगवर तात्काळ कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी कंबर कसली आहे. करदात्यांच्या जीवावर बेतणाऱ्या ह्या जाहिरात फलकांच्या आथिर्क उत्पनास वेळ प्रसंगी मुकावे लागले तरी तरी चालेल, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या भव्य हाेल्डींगला हलवण्याची मागणी टीएमसी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे जेष्ठ नागरिक महेंद्र माेने यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणे