केडीएमसीत अधिकाऱ्यांचे सामूहिक काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:04+5:302021-09-02T05:28:04+5:30

कल्याण : ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सामूहिक ...

Collective agitation of officers with KDM | केडीएमसीत अधिकाऱ्यांचे सामूहिक काम बंद आंदोलन

केडीएमसीत अधिकाऱ्यांचे सामूहिक काम बंद आंदोलन

Next

कल्याण : ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सामूहिक काम बंद आंदोलन केले. अधिकाऱ्यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगुळ आदींनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना यासंदर्भात निवेदन दिले. पवार यांनी सांगितले की, महापालिका अधिकाऱ्यांवर पुन्हा हल्ले होऊ नयेत. त्याची खरी कारणे काय आहेत. त्यामागे कोण लोक आहेत. या सगळ्य़ांचा विचारविमर्श करण्यासाठी अधिकारी एक बैठक घेणार आहेत. सध्या महापालिकेच्या कारवाईसाठी एक पोलीस अधिकारी आणि ४९ पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. जे अधिकारी फिल्डवर असतात, तसेच कारवाईच्या ठिकाणी जातात, त्यांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. महापालिका ४९ पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी पोलीस खात्याकडे पैसे भरते. सशस्त्र पोलीस बंदोबस्तासाठीही पैसे भरण्यात यावेत, या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. सशस्त्र पोलीस बंदोबस्ताचा प्रस्ताव तातडीने पोलीस खात्याकडे पाठविला जाईल.

दरम्यान, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. बेकायदा फेरीवाल्यांची गुंड प्रवृत्ती मोडित काढण्यात यावी. अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन बेकायदा गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

-----------------------------

Web Title: Collective agitation of officers with KDM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.