शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दलातर्फे समुद्रकिनारा स्वच्छता दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:39 IST

डहाणूत झाला कार्यक्रम; शालेय विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग

डहाणू/बोर्डी : जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी सकाळी पारनाका किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलातर्फे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थी, नागरिक, प्रशासनाचे विविध विभाग, डहाणू नगरपरिषद, एसीजी कॅप्सूल, अदानी थर्मल पॉवर स्टेशन आदींनी सहभाग घेतल्याची माहिती कमांडंट संतोष बी.नायर यांनी दिली.या दलातर्फे भारतात २००५ आणि २०१२ पासून डहाणूतील विविध किनाऱ्यांवर ही मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत त्याची अमलबजावणी करताना समुद्रपर्यावरण, पर्यटन, मासेमारी आदींसाठी मिळणारे योगदान या विषयीची माहिती असिस्टंट कमांडंट नेहा राजू बारंगे यांनी दिली.या वेळी के.एल.पोंदा हायस्कूल, अ.ज.म्हात्रे या विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना खास या मोहिमेकरिता तयार केलेले पांढरे टी शर्ट, टोपी आणि ग्लोज देऊन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. प्लास्टिक, पॉलिथीन, टाकाऊ बाटल्या असा सुमारे तीन टन कचरा गोळा केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली.पावसाचा पूर आणि लाटांनी किनाºयावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा येतो. त्याच्या स्वच्छतेकरिता या दलातर्फे राबवली जाणारी ही मोहीम कौतुकास्पद असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश केल्याने अभियानाला बळकटी आली आहे.- सौरभ कटीयार, सहायक जिल्हाधिकारी, डहाणूया दलातर्फे झालेल्या स्वच्छता कार्यक्र मात शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी केल्याने या भावी नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी आरोग्य याविषयी जाणीव होण्यास मदत होईल. आमच्या शाळेकडून त्याला नेहमी सहकार्य मिळेल. - रवींद्र बागे, उपमुख्याध्यापक, पोंदा हायस्कूल