शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या समग्र विकासासाठी सह्यांची मोहीम

By admin | Updated: May 2, 2017 02:06 IST

मराठी ही ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा व्हावी. मराठीच्या समग्र विकासासाठी ठोस पावले उचलावीत,

डोंबिवली : मराठी ही ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा व्हावी. मराठीच्या समग्र विकासासाठी ठोस पावले उचलावीत, यासाठी मराठी भाषेसाठी लढणारे अ‍ॅड. शांताराम दातार आणि ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’तर्फे महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून सोमवारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. त्याला दुपारपर्यंत ६०० नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाईल, असे संस्थेच्या मृणाल पाटोळे यांनी सांगितले. भाषावार प्रांतरचनेनुसार झालेल्या मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यास सोमवारी ५७ वर्षे झाली. राज्याच्या स्थापनेसाठी झालेले आंदोलन आणि १०६ मराठीजनांचे बलिदान याचा पक्षांना विसर पडल्याने आजपर्यंत मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व विकासाचे धोरण ठरवलेले नाही. त्यामुळे मराठी भाषा ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा आजवर झालेली नाही. मराठी भाषेचा समग्र विकास करण्याचे सरकारने ठरवले आहे. मात्र, त्यासाठी ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी डोंबिवलीत रेल्वेच्या मधल्या पुलावर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेचे धोरण ठरवले जावे, ही बाब राजकीय पक्षांच्या लक्षात यावी, यासाठी टिष्ट्वटरचाही वापर करण्यात आला. टिष्ट्वटर पाहूनही नागरिक या मोहिमेत सहभागी झाले.गुलाब वझे यांनी सांगितले की, प्रतिष्ठानने राबवलेली ही मोहीम स्तुत्य आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, हा चांगला योग जुळून आला आहे. नुकतेच येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्या अनुषंगाने या भाषेला आपण सर्व दर्जा मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)डोंबिवली स्थानकाचा १३० वा वाढदिवसडोंबिवली स्थानकाचा १३० वा वाढदिवस सोमवारी शिवसेनतर्फे साजरा झाला. स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात केक कापण्यात आला. भाऊसाहेब चौधरी, ओमप्रकाश करोटिया व प्रवासी सहभागी झाले होते. मराठीचा अभिमान आशा तिरकणावर यांची मातृभाषा ही कानडी आहे. पण, अनेक वर्षे त्या महाराष्ट्रात राहत आहेत. त्यांचे शिक्षणही मराठीत झाले आहे. मराठीसाठी सरकारने धोरण ठरवावे, यासाठी त्याही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.