शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती

By अजित मांडके | Updated: September 30, 2022 16:34 IST

महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यात गुरुवारी उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने टेंभी नाका देवीची महाआरती करुन एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले असतांनाच शुक्रवारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह देवीची विधिवत पुजा केली. तसेच महाआरती देखील केली. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव. त्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांच्या समवेत वडील संभाजी, पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू आदींसह कुटुंबातील इतर सदस्य या पुजेत सहभागी झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही पुजा सुरु झाली. तर साडेतीन वाजता महाआरती घेण्यात आली. यावेळी शिंदे गटातील महत्वाचे पदाधिकारी व इतर कार्यकत्र्यानी टेंभीनाक्यावर गर्दी केली होती. दरम्यान गुरुवारी उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावर हजेरी लावून देवीची महाआरती केली होती. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. तसेच सभा मंडपातच घोषणाबाजी देखील केली होती. 

त्यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच विधिवत पुजा केली व महाआरती देखील केली. जवळ जवळ तासभर हा कार्यक्रम सुरु होती. परंतु यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्ही केले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दरवर्षी देवीची पुजा केली जाते. त्यानुसार या वर्षी देखील ती पुजा व महाआरती करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी दिली. परंतु हे कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन नव्हते असेही शिंदे गटाच्या पदाधिका:यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी टेंभी नाक्यावर हजेरी लावल्याचे दिसून आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे