शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

क्लस्टरला पहिली हरकत प्रताप सरनाईकांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:26 IST

ठाणे महापालिकेने आता क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची अधिसूचना जाहीर केली आहे. या मध्ये ठाणे शहरातील ४४ विभाग निश्चित केले आहेत.

ठाणे - ठाणे महापालिकेने आता क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची अधिसूचना जाहीर केली आहे. या मध्ये ठाणे शहरातील ४४ विभाग निश्चित केले आहेत. परंतु, शहरातील सरसकट सर्व झोपड्या व अनधिकृत इमारतींचा समावेश न करता फक्त काही भागांचा समावेश केल्याने इतर भागातील नागरिकांवर अन्याय होणार असल्याने सरसकट सर्व झोपड्या व अनधिकृत इमारतींचा समावेश करावा, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. त्यातही आठ हजार चौरस मीटर पर्यंतच्या झोपडपट्टींमध्ये एसआरए योजना राबववितांना क्लस्टरचे फायदे द्यावेत, तर त्यापुढील झोपडपट्टींचा समावेश क्लस्टरमध्ये करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व सूचना मांडण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिल्याने सर्वांना समान न्याय मिळून योजना लवकरात लवकर मार्गी लागेल, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.क्लस्टरमध्ये ओवळा माजिवडा मतदारसंघातील शास्त्रीनगर, सहकारनगर, लक्षी चिरागनगर, नळपाडा, सुभाषनगर, घोडबंदर रोडवरील जय भवानीनगर आदी परिसराचा समावेश नाही. तसेच माजिवडा गाव, वाघबीळ गाव, कासारवडवली व भार्इंदर पाडा या गावठाण विभागाचा समावेश करताना त्या परिसरामध्ये झोपड्या किंवा अनधिकृत बांधकामे नसून जुन्या काळातील आगरी व कोळी बांधवांची मोठमोठी घरे असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे काही भागांवर अन्याय झाल्याची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.एसआरए योजनेत २००० पूर्वीच्या पात्र घरांना २६९ चौ.फुटाचे घर व क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत तळ मजल्यापासून इतरही मजल्यावरील घरांना ३२३ चौ.फुटाचे मोफत घर मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा कल एसआरएऐवजी क्लस्टर योजनेकडे आहे. त्यात शहरातील एका भागाला न्याय देत असताना शास्त्रीनगर, सहकारनगर, लक्ष्मी चिरागनगर, नळपाडा, सुभाषनगर, घोडबंदर रोडवरील जय भवानीनगर आदी परिसरावर अन्याय केल्या सारखे होईलद्व असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ याच भागात ही परिस्थिती नसून शहरातील इतर भागतहीहीच परिस्थिती असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.एसआरए प्रकल्पही घ्याशहरातील ज्या घोषित झोपडपट्ट्या आहेत व ज्यांचे प्रस्ताव एसआरए दफ्तरी दाखल आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये व त्यांनाही ३२३ चौ.फुटाचे मोफत घर मिळावे यासाठी असे विकास प्रस्ताव रद्द करून त्यांनाही क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत सामावून घेण्यात यावे जेणेकरून शहरातील एका विभागाला न्याय व दुसऱ्या विभागावर अन्याय होणार नसल्याचेही सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या