शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

क्लस्टर योजनेतून ठाण्यात २३ हजार अतिरिक्त घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:14 IST

ठाणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध असून त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबवण्याचे प्रस्तावित केले

ठाणे : ठाणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध असून त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबवण्याचे प्रस्तावित केले असून यातून २३ हजार अतिरिक्त घरे निर्माण होणार असल्यामुळे परवडणाºया घरांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. यात मुख्य शहराबरोबरच कळवा, मुंब्रा, कौसा या उपनगरांचाही विकास होऊन रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार असल्याने ठाणेकरांचे राहणीमान उंचावणार असल्याचा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला.ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत कलस्टर योजनेचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर, ते बोलत होते. या योजनेमुळे ठाणे शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असून शहराच्या विकासासाठी कसलीही तडजोड न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना दिल्या. या बैठकीला शहर व विकास नियोजन अधिकारी, क्रि सिलचे सल्लागार, शहर नियोजनतज्ज्ञ संजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.शहराच्या एकूण तुलनेत २२ टक्के इतकी जमीन क्लस्टरअंतर्गत विकसित करण्यात येणार असून यामुळे ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. यामध्ये क्र ीडा, सांस्कृतिक, सुरक्षितता, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाटी स्वतंत्र जागा, त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरवणारे कम्युनिटी सेंटर आदी विपुल प्रमाणात सुविधा निर्माण होणार आहेत. या सुनियोजित पुनरुत्थान योजनेमुळे एकूण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये जेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संधी ठाणे शहरात निर्माण होणार आहे.