शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

‘बेकायदा’ शिक्का पुसण्याचा क्लस्टर हाच मार्ग

By संदीप प्रधान | Updated: October 23, 2023 09:22 IST

यापैकी कुणालाही अतिरिक्त मोह झाला तर ही घरे उभी राहणार नाहीत.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील किसननगर, हाजुरी वगैरे सुमारे ४३ हेक्टर परिसरातील मोकळ्या सरकारी भूखंडावर क्लस्टर योजनेच्या माध्यमातून १६ हजार ५७८ घरे उभारण्याच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिली. कागदावर ही योजना आकर्षक आहे. मात्र, ही योजना यशस्वी करणे राजकीय नेते व नोकरशाहीची इच्छाशक्ती व ज्यांना घरे मिळणार आहेत त्यांचे सहकार्य यावर अवलंबून आहे. यापैकी कुणालाही अतिरिक्त मोह झाला तर ही घरे उभी राहणार नाहीत.

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व शहरे ही बेकायदा बांधकामांनी शापित आहेत. न्यायालयाने या शहरांना बेकायदा बांधकामांचे आगार ठरवले आहे. येथील लक्षावधी बांधकामे पाडून टाकली तर मोठा आक्रोश होईल. कारण लोकांनी त्यांचे कष्टाचे पैसे ओतून व कर्ज काढून ही घरे खरेदी केली आहेत. 

बेकायदा बांधकाम उभारणारे जसे दोषी आहेत तसेच त्या बांधकामांतील घर खरेदी करणारेही दोषी आहेत, हे मान्य. परंतु, या सामूहिक चुकीला बुलडोझर लावून घरे पाडणे हा पर्याय असू शकत नाही. क्लस्टरच्या माध्यमातून पुन्हा ही शहरे सुयोग्य नियोजन करून बांधून काढणे, नागरी सुविधा उपलब्ध करणे, रुंद रस्ते तयार करणे हाच मार्ग आहे. एकाच वेळी काही हेक्टर जमीन विकसित केली तर भुरट्या बिल्डरांचे फावणार नाही.शापूरजी पालनजी, एल अँड टी, टाटा, गोदरेज असे मातब्बर बांधकाम व्यावसायिक ही कामे मिळवतील. कामाचा दर्जा चांगला राहील व बेकायदा गोष्टींना थारा राहणार नाही. क्लस्टरमध्ये हेच अपेक्षित आहे.

मोकळे भूखंड होणार विकसित

ठाण्यातील एकेका बिल्डिंगचा विकास करायला गेल्यास ते अशक्य आहे. काही इमारतींनी संपूर्ण एफएसआय वापरलाय. त्यामुळे बिल्डर या बिल्डिंगच्या पुनर्विकासाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मात्र, अनेक इमारतींचा एकत्र विकास केला तर विकास होऊ शकतो. रस्त्यालगत बाजारभावाने विकली जातील अशी घरे होतील. मागच्या बाजूला पुनर्विकासातील घरे होतील. सरकारच्या प्रस्तावात तर मोकळ्या भूखंडावर घरे बांधली जाणार असल्याने लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये ठेवायची भानगड नाही.

कोर्टकज्ज्यामुळे होते नुकसान

पुनर्विकास योजनेत साऱ्यांचाच मोह आडवा येतो. प्रचंड मोठी योजना राबवली जातेय म्हटल्यावर राजकीय नेत्यांना यात बिल्डरकडून पार्टनरशिप मिळेल का? चौरस फुटांच्या रेटने पैसे मिळतील का? अशी खा खा सुटते. सर्व पक्षांचे नेते आपापल्या ताकदीनुसार पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. मग नोकरशहा येतात. ज्या ज्या विभागांची परवानगी, एनओसी हवी त्या टेबलवर बसलेले अधिकारी आपल्याला काय मिळणार म्हणून आशाळभूतासारखे हात पसरतात. सरतेशेवटी रहिवासी सारेच खाबुगिरी करतायत तर मग मी योजना अडवली तर मला काही वेगळे मिळेल, अशी हाव त्यांनाही स्वस्थ बसू देत नाही. 

अमूक दिले तर तमूकही द्या, अशा मागण्या केल्या जातात. पोलिस केस, कोर्टकज्जे अशा दुष्टचक्रात पुनर्विकास अडकला तर मग बिल्डरचे धंद्याचे गणित बिघडते. त्याने बाजारातून पैसे उचललेले असतात. मग तो म्हणतो तुम्हाला सगळेच ओरबाडायचे आहे तर मी योजना अर्धवट टाकून देतो. कोर्टाचे खेटे घालत बसा.

आर्थिक जातीव्यवस्थेचाही अडसर

एका इमारतीच्या पुनर्विकासात दहा कुटुंबांची तोंडे दहा दिशांना असतात. समूह विकासात तर चाळकरी, झोपडपट्टीवासीय, सोसायट्या या साऱ्यांचाच कदाचित एकत्र विकास होईल. चाळकऱ्यांना झोपडपट्टीवासीय अस्पृश्य वाटतात, तर सोसायटीवाले चाळकऱ्यांना तुच्छ लेखतात. ही आर्थिक जातीव्यवस्था हाही योजनेतील अडसर ठरू शकतो. मोह टाळून आपल्याला आपला व परिसराचा विकास करायचाय. न्यायालयाने बेकायदा इमारतींचे शहर हा ललाटी मारलेला शिक्का पुसायचा आहे, ही इच्छाशक्ती असेल तरच ठाणे जिल्ह्यातील शहरे नव्याने बांधून घेता येतील.

 

टॅग्स :thaneठाणे