शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

By admin | Updated: July 3, 2017 06:12 IST

कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला संघटनेने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. या संघटनेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांना ग्राहक नसल्याची बाब त्यांनी या वेळी मांडली. अखेर, देवळेकर यांनी त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्यास सहमती दर्शवली.डिसेंबर २०१६ पासून कार्यरत असलेल्या ‘स्वशक्ती’ संघटनेत डॉ. भाग्यश्री मोघे, साधना जोशी, रेखा शिधोरे, अमृता मोडक, भाग्यश्री कुलकर्णी, भारती चाफेकर आदी कार्यरत आहेत. डॉक्टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा विविध पदांवर संघटनेच्या सदस्या कार्यरत आहेत. त्या त्यांचा नोकरी-व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी एक प्रकल्प घेऊन काम करत आहेत.कापडी पिशव्या बनवण्यासाठी त्यांनी विविध परिसरांत फिरून वापरलेले जुने कपडे गोळा केले. त्यातून त्यांनी जवळपास ५०० कापडी पिशव्या शिवलेल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याचा आग्रह त्या दुकानदारांकडे धरत आहेत. मात्र, दुकानदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. एक कापडी पिशवी त्या १० रुपयांना विकत आहेत. कापडी पिशव्या विकून नफा कमावण्याचा त्यांचा उद्देश नाही. मात्र, पिशव्यांच्या शिलाईवर झालेला खर्च त्यातून निघावा, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याची जागृती त्या नागरिकांमध्ये करत आहेत.महापौरांनी प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवलीचा संकल्प जाहीर केल्याचे समजताच संघटनेने महापालिकेत देवळेकर यांची भेट घेतली. महापालिका संघटनेकडून कापडी पिशव्या विकत घेऊन त्या नागरिकांना देईल, असे आश्वासन या वेळी देवळेकर यांनी त्यांना दिले.संघटनेच्या साधना जोशी यांनी सांगितले की, फॅशन आणि चित्रपटांचे मार्केटिंग करावे लागत नाही. चित्रपट लगेच पाहिले जातात. फॅशनचे अनुकरण लगेच केले जाते. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, यासाठी जागृती करावी लागते. इतकेच नव्हे तर शिक्षित समाजवर्गात जागृतीचे काम करूनही नागरिक प्लास्टिक पिशव्याच वापरतात, हीच खरी खंत आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवतात. महापालिकेकडे वर्गीकृत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प नसल्याने वर्गीकरणाचा काही उपयोग होत नाही. कचरा वेगळा गोळा करूनही तो एकत्रितपणेच डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.विद्यार्थ्यांना देणार बक्षीस‘स्वशक्ती’ मधील अमृता मोडक या बालकमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या म्हणाल्या की, शाळेत विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सांगितले जाते. तो कुठेही फेकून दिला जात नाही. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले जाते. यापुढे बक्षीसही दिले जाणार आहे.