शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 05:05 IST

ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बंदचा परिणाम झाला आहे

- सुरेश लोखंडे ठाणे : आरक्षणासाठी मराठा समाजाने वेगवेगळ्या दिवशी राज्यभरात जिल्हा बंदचे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातच, मालवाहतूकदारांचाही संप सुरू आहे. परिणामी, शहरांकडे येणाºया या जीवनावश्यक वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या जलसमाधीच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्टÑातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बंद पुकारले जात आहेत. आंदोलकांकडून महामार्गांवरील वाहतूक अडवून जाळपोळ केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक अन्नधान्य, भाजीपाला आदी मालवाहतूक करण्यास चालक धजावत नाहीत. ठिकठिकाणी दिवसभर होणाºया आंदोलनाची झळ रात्रीच्या दरम्यान होणाºया मालवाहतुकीलाही बसली आहे. भेदरलेले चालक गाडीवर बसण्यास तयार नाहीत. यामुळे नवी मुंबई या सर्वाधिक मोठ्या बाजार समितीसह ठाणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये गुरुवारीदेखील अत्यल्प भाजीपाल्यासह अन्नधान्याची आवक घटल्याचे निदर्शनात आले.मालवाहतूक करणाºया ट्रक-टेम्पोंचा बेमुदत संप सुरू आहे. मात्र, त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यास आले आहे. या संपादरम्यान जीवनावश्यक वाहतुकीवर परिणाम झाला नाही. परंतु, तीन दिवसांपासून ठिकठिकाणी झालेल्या बंदच्या आंदोलनामुळे अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला आदींचे सुमारे एक हजार ५०० ट्रक रोज होणारी मालवाहतूक मंगळवारी केवळ ८२ ट्रक आणि ८८४ टेम्पोंची आवक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी झाल्याचे निदर्शनास आले. याखालोखाल ४८ ट्रक आणि ९७ टेम्पो मालाची आवक कल्याण या द्वितीय क्रमांकाच्या बाजार समितीमध्ये झाली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvegetableभाज्या