शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वेचा मार्ग मोकळा; ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 02:00 IST

सिडको देणार जागा, राजन विचारेंनी केली पाहणी

नवी मुंबई : कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गासाठी साडेचार हजार चौरस मीटर जागा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्याचा निर्णय शुक्रवारी १६ आॅक्टोबर रोजी सिडकोने घेतला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील भार कमी करणाऱ्या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया दोन्ही प्राधिकरणांच्या माध्यमातून लवकरच सुरू केली जाणार आहे. सिडको कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीनंतर खासदार राजन विचारे यांनी दिघा स्थानकाच्या जागेची पाहणी केली.

कल्याण-डोंबिवलीमधून नवी मुंबईत येणाºया आणि नवी मुंबईतून कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने जाणाºया नागरिकांना ठाणे रेल्वे स्थानकात गाडी बदलावी लागू नये यासाठी कळवा-ऐरोली हा एलिव्हेटेड रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गा$तील अडथळे दूर करण्यासाठी खासदार विचारे यांनी सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची नवी मुंबईत शुक्रवारी बैठक घेतली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एमआयडीसी आणि राज्य सरकारने आपली जमीन रेल्वेकडे हस्तांतरित केली आहे. फक्त सिडकोची जमीन अद्याप हस्तांतरित झाली नाही. ही जमीन तातडीने हस्तांतरित करावी, अशी सूचना विचारे यांनी सिडकोच्या प्रशासनाला केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी प्रशासनाला दिले.या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एमआरव्हीसीचे संचालक विजय नाथावत, एस.एस. खुराना, प्रकल्पाचे उपव्यवस्थापक एस.के. चौधरी, साहाय्यक अभियंता सी.पी. कुलदीप आदी उपस्थित होते.डिसेंबर २०२१ पर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरू होणारकळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक या दोन्ही प्रकल्पांमध्ये असलेले अडथळे दूर झाले आहेत. एलिव्हेटेड मार्गासाठी सिडकोच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्नही मार्गी लागला असून दिघा रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे.- राजन विचारे, खासदार

टॅग्स :railwayरेल्वे