शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात सफाईची पोलखोल

By admin | Updated: June 26, 2017 01:26 IST

शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिल्याने शहरांतील सखल भागासह इतर परिसरातही पाणी तुंबल्याचे चित्र प्रामुख्याने रविवारी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण / डोंबिवली : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत राहिल्याने शहरांतील सखल भागासह इतर परिसरातही पाणी तुंबल्याचे चित्र प्रामुख्याने रविवारी सकाळी पाहयला मिळाले. विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगटासह कोसळलेला या पावसात झाडे उन्मळण्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या. या पावसाचे पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने पहिल्याच पावसात मोठ्या नाल्यांच्या सफाईसह छोटया मोठ्या गटारींच्या सफाईच्या कामांची पोलखोल समोर आली. गेल्या २४ तासात कल्याणमध्ये १५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.कल्याण पूर्वेतील पिसवली, आशेळे पाडा येथे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. याठिकाणचा तिसगाव नाला भरून वाहायला लागल्याने दामोदरनगर, नंदादीपनगर, यादवचाळ परिसरातील भागांमध्ये पाणी साचले होते. चेतना शाळेच्या पुढे बुद्ध विहाराजवळ, विष्णूधाम, एकविरा, राधाकृष्ण पार्क समोरील नागरिकांच्या घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी तुंबले होते. शंभर फुटी रस्त्याचा परिसरही पाण्याखाली गेल्याने रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहनेही पाण्यात बुडाली होती. कल्याण खाडीच्या पातळीत वाढ झाल्याने डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर, गरिबाचा वाडा, तर कल्याणमधील गोविंदवाडी, दुर्गाडी परिसरात पाणी भरले होते. मोठ्या प्रमाणावर झाडे पडली. कल्याणमध्ये सायंकाळपर्यंत तब्बल २५ ते ३० झाडे उन्मळून पडली तर डोंबिवलीत १० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. डोंबिवलीतील गोग्रासवाडी पाटीलचाळ, रामनगरमधील सुखी जीवन सोसायटी, टिळकनगर, गोपाळनगर, तुकारामनगर, केळकर रोड, कोपर रोड, भोपर, जुनी डोंबिवली, महात्मा फुले रोड यासह कल्याण-शीळ रोड, निवासी विभाग, नांदिवली येथे पाणी तुंबले होते. डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरात झाड कोसळण्याच्या स्थितीत आल्याने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठाशनिवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कचरा, माती, गाळ वाहून आला आहे. तो साफ करण्यासाठी काहीवेळ पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने पुढील दोन कल्याण, डोंबिवलीमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली.