शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरांत स्वच्छतेची झाडाझडती; स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:30 IST

केडीएमसीच्या हद्दीतील स्वच्छतागृहांची पाहणी

- अनिकेत घमंडी डोंबिवली : केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षण समितीचे पथक डोंबिवलीत दाखल झाले आहे. केडीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या विविध विभागांमध्ये या पथकाने शुक्रवारी पाहणी केली. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे सर्वेक्षण करण्यात येत असून यामध्ये कल्याण-डोंबिवली हागणदारीमुक्त शहरे आहेत की नाहीत, याबाबत पाहणी करण्यात आली.अस्वच्छतेची सर्वात मोठी समस्या असलेल्या या दोन शहरांमध्ये केंद्राच्या निकषानुसार पाहणी करण्यात आली. या पथकातील अधिकारी मयूर सोमवंशी यांच्यासोबत केडीएमसीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी, अभियंते राजू नासर हेदेखील दिवसभर होते. त्यांनी सकाळी १०.१५ वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत नऊ ठिकाणी पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शौचालयांची सुविधा आहे का? यावर विशेष भर देण्यात आला. उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण किती आहे? नाही याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेण्यात आली.डोंबिवलीमध्ये त्यांनी फतेह अली रोडवरील महापालिकेची हिंदी शाळा, तसेच महात्मा ज्योतिबा फुले शाळा, आजदे गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच शास्त्रीनगर रुग्णालयातील शौचालय, मोहने येथील स्वच्छतागृहेही तपासली. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालयानजीकचा इंदिरानगर झोपडपट्टी भाग आणि मोहन्यातील महात्मा फुलेनगर भागातील स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी पाहणी केली.हागणदारीमुक्त भारतासाठी बंदिस्त शौचालयांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष प्रयत्न करणे, जनजागृती करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले होते. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समिती आली आहे. शनिवारीही विविध ठिकाणी पाहणी करण्यात येणार आहे. शनिवारी कुठे पाहणी करणार, याबाबतची माहिती मात्र आताच सांगता येणार नाही. सर्व माहिती केंद्रांतून संबंधित अधिकाºयांना मिळेल. त्यानुसार ते पाहणी करणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. तसेच शुक्रवारी केलेल्या पाहणीत ते शौचालयांच्या स्वच्छतेवर समाधानी असल्याचे सांगण्यात आले.दौऱ्याबाबत कमालीची गुप्ततासमिती अधिकारी डोंबिवलीमधील बाजीप्रभू चौकानजीकच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी करणार होते. पण ते तेथे गेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, तेथील स्वच्छतागृह पाण्याआभावी बंद होते. जर ते तेथे गेले असते तर सार्वजनिक स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याचे उघडकीस आले असते. माहिती घेतली असता तेथील पाण्याचे कनेक्शन तांत्रिक कारणाने बंद असल्याचेही सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याण दौºयावर येत असून त्यांच्या येण्याआधी ही समिती पाहणी करत आहे. त्यामुळे पाहणीला विशेष महत्त्व देण्यात आले होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांनी या दौºयाबबत प्रचंड गोपनीयता बाळगली होती. महापौर विनिता राणेंसह महापालिका अधिकाºयांना या पाहणीबाबत विचारले असता त्यांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान