शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात सुका-ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात; मात्र २८ मेट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रियेचा महापालिकेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 17:52 IST

उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहरात सुका- ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात असतांना महापालिकेने २८ मेट्रिक टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्माण करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. ओला कचरा प्रक्रिया केंद्राची दुरावस्था झाली असून प्रक्रिया केंद्रात ओला कचरा टाकताच येत नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.

 उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो. कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या आदींचा भरणा जास्त असल्याने, डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्माण करण्यासाठी कचरा प्रक्रिया केंद्र महापालिकेने सुरू केले. हिराघाट, भाजी मार्केट, कॅम्प नं-३ दसरा मैदान, कॅम्प नं-५ मधील लालसाई उद्यान जवळ, वधारीया फौंडेशन आदी ठिकाणी ओला कचऱ्या प्रक्रिया करण्यासाठी केंद्र बांधण्यात आले. याठिकाणी कर्मचारीवर्ग भाजी मंडई व इतर ठिकाणचा ओला कचरा गोळा करून प्रक्रिया केली जाते. तसेच कंपोस्ट प्लास्टिक पिशवी बॅग मध्येही ओला कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. 

शहरातून दररोज ३६० मॅट्रिक टन कचरा निघत असल्याचे गृहीत धरले जाते. त्यापैकी २८ मॅट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खत बनविण्यात येते. अशी माहिती आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली असलीतरी, शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची मोजमाप होत नसताना, २८ मेट्रिक टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया होते. हे कोणत्या अंदाजानुसार.,असा प्रश्न विचारला जात आहे.

घराघरातून गोळा करण्यात येत असलेला कचरा एकत्र उचलला जातो. कचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण केले जात नसून ओला कचरा प्रक्रिया केंद्रात नावालाच केला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच प्रक्रिया केंद्राची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. महापालिका ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केलेला लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जात असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.  

खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ ? 

महापालिकेचे राणा खदान डम्पिंग पाठोपाठ खडी खदान ओव्हरफ्लॉच्या मार्गावर आहे. तर उसाटणे येथील डम्पिंगचा तिढा सुटत नसल्याने, कचऱ्याच्या समस्यांची तलवार उभी ठाकली आहे. असे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व्यक्त केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न