शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून भाजपा आमदार मेहतांच्या बंगल्यावर राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:36 IST

मेहतांना मारण्याची धमकी व कार्यालयाची तोडफोड

मीरारोड - मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यात दोन गटात तुंबळ राडा झाला. धारदार शस्त्र व हॉकी सह लाथा बुक्कयांनी दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. मेहतांच्या कार्यालयात तोडफोड केली. आ. मेहतांना सोडणार नाही सांगत मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जखमी इसमासह आ. मेहतांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींवर चक्क दोन वेगळवेगळे गुन्हे नवघर पोलिसांनी दाखल केले आहेत. आमदाराच्या बंगल्यावर जमीनीच्या वादातून झालेल्या राड्याने खळबळ उडाली आहे.आ. मेहतांचे स्वीय सहाय्यक असलेले दर्शन शर्मा यांनी नवघर पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार, गोल्डन नेस्ट मधील ब्लु मुन क्लब जवळ शगुन बंगला हे आ. मेहतांचे निवासस्थान आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास भाजपाचे पदाधिकारी असलेले फिरोज शेख हे मनीष ओझा रा. दादर याला घेऊन आ. मेहतांना भेटण्यास आले होते. ओझाची कनकिया भागात जमीन असून ती अजय दुबे याने खरेदीच्या व्यवहारावरुन वाद होता. सदर वादामुळे फिरोज शेख यांनी ओझाला आ. मेहतांच्या बंगल्यावर नेले होते, असे सुत्रांनी सांगितले.फिरोज बरोबर मेहतांच्या बंगल्यात बसलेला ओझा हा उठुन बाहेर गेला. बंगल्याच्या बाहेर थांबलेल्या अजय व अरुण दुबेंवर ओझासह त्याचा भाऊ, राजेंद्र बनसोडे, सागर जाधव, राकेश व अन्य साथीदारांनी हल्ला चढवला. हॉकी स्टीक व लाथा बुक्कायांनी बेदम मारहाण करतानाच अजयच्या पाठीवर धारदार शस्त्राने जखम करण्यात आली.काही वेळातच बाहेरुन अजय व त्याचा भाऊ अरुण वाचवा वाचवा म्हणून ओरडत आत आले. त्यांच्या मागे ओझाही दुबे बंधूंना मारहाण करत बंगल्यात शिरले. त्यावेळी ओझा व साथीदारांनी मेहता कोभी छोडेंगे नही, किधर है आमदार असा आरडा ओरडा करत मेहतांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक केली.आरडा ओरडा ऐकुन आ. मेहतांंच्या पत्नी सुमन बाहेर आल्या आणी नवघर पोलिसांना बोलावण्यास सांगितले. दरम्यान सुरक्षा रक्षकां सह अन्य लोकं धावल्याने हल्लेखोर पळू लागले. बंगल्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले व आत अडकलेले हल्लेखोर बनसोडे व जाधव यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने नंतर परिसरात तणाव होऊन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रकरणी जखमी अजयच्या तसेच आ. मेहतांचे सहाय्यक शर्मा यांच्या फिर्यादी वरुन मनीष ओझा सह साथीदारांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी बनसोडे व जाधवला अटक केली असुन ओझासह त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दुबे यांच्या फिर्यादी नुसार एका गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक थाटकर तर दर्शन यांच्या फिर्यादी नुसार दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राठोड करत आहेत. कनकिया भागातील एक भुखंडाच्या व्यवहारातुन ओझा व दुबे यांच्यात वाद होता.