शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरच्या सीमांकनाचा वाद पुन्हा उफाळला, गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केली नाराजी व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:40 IST

क्लस्टरचे पाच ठिकाणांचे आराखडे मंजुर झाले असले तरी सीमांकनाचा वाद अद्यापही संपुष्टात आला नसल्याचे दिसत आहे. गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी सीमांकन न करताच क्लस्टर योजना मंजुर केलीच कशी असा सवाल उपस्थित करीत या विरोधात आवाज उठविण्याचा पुन्हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसीमांकन निश्चित करण्याचा अधिकार पालिकेला नाहीपुन्हा रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

ठाणे - ठाणे शहरातील पाच ठिकाणांचा क्लस्टरचा आराखडा गुरुवारी झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु असे असतांना आता क्लस्टरचा नवीन वाद आता निर्माण झाला आहे. महसूलमंत्र्याचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात क्लस्टर राबविण्याची पालिकेला घाई झाल्याचा आरोप गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळेच महसूल विभाग व भू मापन विभागाने करायचे सिमांकनाचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने घाई घाईने क्लस्टर राबविण्यासाठी चालू केल्याची माहिती या स्थानिक भुमीपुत्रांनी दिली आहे.                     कोळीवाडा व गावठाणांचे विस्तारित सिमांकन झाले नसताना श्रेय वादासाठी वैयिक्तक स्वार्थासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून प्रशासन क्लस्टर चे सुधारित प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडले होते. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरीसुध्दा दिली आहे. परंतु हे कायद्याला धरुन नसल्याचा मुद्दा गावठाण कोळीवाड्यातील रहिवाशांनी केला आहे. ठाण्यातील भूमिपत्रांनी याबाबतचे सविस्तर असे निवेदन सोमवारी १७ डिसेंबरला महापौर मीनाक्षी शिंदे यांना दिले होते. त्यावर सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. या प्रस्तावाला स्थगिती द्या अशी विनंती सुध्दा यावेळी करण्यात आली होती. परंतु असे असतांना गुरु वारी महासभेत क्लस्टरचा प्रस्ताव मंजूर कसा झाला असा प्रश्न ठाणे गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. कोपरी व राबोडी या परिसरात कोळीवाडे गावठाण येत असून त्याचे त्याचे महसूल विभागामार्फत व भू नगरमापन विभागाकडून विस्तारित सिमांकन झालेच नाही. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही ते लवकरात लवकर व्हावे ही कोळीवाडा व गावठाण यांची मागणी शासनाकडे आजही प्रलंबित आहे. हद्द निश्चित करण्याचे काम पालिकेचे नसून ते महसूल व भूमापन विभागाचे आहे. जर संबधित विभागाने कोळीवाडा व गावठाण यांचे विस्तारित सिमांकन केलेच नाही तर पालिकेच्या प्रशासनाने क्लस्टर चा सुधारित प्रस्ताव बनविलाच कसा? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या संदर्भात समितीचे सदस्य गिरीश साळगावकर यांनी सांगितले आहे की सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टरच्या प्रकल्पाला मंजुरी देणे चुकीचे आहे. त्यामुळे याविरोधात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस