शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

छातीत दुखल्याचा दावा करीत वकील पुत्र रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:04 IST

नौपाडा पोलिसांच्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आदित्य फड या वकील पुत्राने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने उपचाराची न्यायालयाने परवानगी दिली. त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलिसांवर गाडी घालण्याचा केला होता प्रयत्नठाणे न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश उपचारासाठी न्यायालयाकडे मागितली परवानगी

ठाणे : सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य एकनाथ फड (१८) या कथित आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला न्यायालयाच्या परवानगीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड तसेच खासगी वकील एकनाथ फड यांचा पुत्र आदित्यने ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन हात नाका येथे बंदी असलेली काळी फिल्म लावलेल्या कारने येऊन आधी सिग्नल तोडला. नंतर लायसन्सची मागणी करणाºया वाहतूक पोलिसांनाच उर्मटपणे उत्तरे दिली. लायसन्सची मागणी करणाºया अजित खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलवर त्याची कार नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार अडविणाºया हारुगले आणि थोरवे या पोलिसांवरही त्याने गाडी नेण्याचा प्रयत्न करुन तिथून पलायन केले होते. त्याला सायंकाळी धर्मवीरनगर येथून नौपाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्यावरील गंभीर आरोपामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून रवानगी होणार होती. मात्र त्याने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांकडे केली. त्यानुसार वकील वडीलांच्या मदतीने त्याने न्यायालयात अर्ज करुन रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी मागगितली. न्यायालयाने त्याचा अर्ज मान्य केल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय