पालघर : पालघर विधानसभेच्या काल झालेल्या निवडणुकी मध्ये ६५.२४ ला मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकी पेक्षा(६८ टक्के) ह्या पोटनिवडणुकी मध्ये मतदरांमध्ये उत्साह नसल्याने कमी मतदान झाल्याचे दिसून आले. वाढवण बंदराची मेक इन इंडिया कार्यक्रमात असलेली चर्चा, काही उमेदवारांना झालेली पक्षबाह्य मदत, आणि पाड्यापांड्यातून मतदारांना मतदानासाठी काढण्यात मिळालेले यश इ. कारणांमुळे तिन्ही प्रमुख उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. या मतदाना वेळी भाजपा व मित्र पक्षांनी आपल्याला किनारपट्टी वरील मतदारांनी साथ दिल्याचा दावा केला आहे. तर पालकमंत्र्यांनी विजय आमचाच असून दुसऱ्या क्रमांकासाठी काँंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीत लढत झाली, अशी मल्लिनाथी केली आहे. पालघर विधानसभेचे आमदार कृष्णा घोडा यांचे अकस्मित निधन झाल्याने पालघरसाठी शनिवारी मतदान पार पडले. शिवसेनेकडून अमित घोडा, काँग्रेसकडून राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीकडून मनिषा निमकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जग्गनाथ वरठा तर बहुजन मुक्ती पार्टीकडून दिलीप धूमाँडा इ.उमेदवार रिंगणात होते. परंतु खरी लढत ही शिवसेना कांग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तीन पक्षात झाली. सेनेला भाजपा, रिपाईची साथ. काँग्रेसला राष्ट्रवादी,जनता दल,तर बहुजन विकास आघाडी ला दलित पैंथर सह अन्य संघटनांची साथ मिळाली होती.सन २०१४ साली झालेल्या विधान सभा निवडणुकीत एकूण २ लाख ४१ हजार ०४४ मतदान पैकी १लाख ६४ हजार १८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता(६८.४टक्के) मतदान झाले होते. कल झालेल्या निवडणुकी साठी एकूण २लाख ४७ हजार ५९६ मतदार पैकी १लाख ६४ हजार १८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवाला.त्यापैकी पुरुष ८५ हजार ६१७ , स्त्रिया ७५हजार ९०८ तर इतर १०मतदारांचा समावेश होता. त्यामुळे एकूण ६५-२४ मतदान झाले मतदरा मध्ये ६ हजार५५२ मतदारांची वाढ झाली असेल तरी मागच्या वेळा पेक्षा २.७६ टक्के मतदान कमी झाले. या प्रचारात वाढवण बंदर हा प्रमुख मुद्दा समोर आला होता. सेनेने मुख्यमंत्री, सेनाध्यक्ष यांच्या सह मंत्री, खासदार, पदाधिकारी यांना तर कांग्रेसने माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते , खासदार, आमदार यांना तर बविआची सारी सूत्रे अध्यक्ष व आमदार हितेन्द्र ठाकुर यांनी हाती ठेवली होती.
तीनही पक्षांचा विजयाचा दावा
By admin | Updated: February 15, 2016 02:53 IST