शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 19:36 IST

उल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळा मैदान व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविण्यात आले. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली, विरोधी पक्षांनी उडवून शाळेच्या शिक्षकासह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळा मैदान व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविण्यात आले. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली विरोधी पक्षांनी उडवून शाळेच्या शिक्षकासह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.उल्हासनगरचा तब्बल ४३ वर्षानंतर शहर विकास आराखडा मंजूर झाला. सुरुवातीला नवीन विकास आराखड्यामुळे शहर विकास साधले जाणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. मात्र एका आठवड्यात विकास आराखड्याची पोलखोल सुरू झाली. बिल्डर व धनदांडगा धार्जिणा विकास आराखडा मंजूर झाल्याची टीका शिवसेनेसह रिपाइं, कॉग्रेस, राष्टवादी, भारिप, पीआरपी, साई पक्षाने केली. महापालिका महासभेने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात, नागरिकांच्या हरकती व सूचनेचा विचार केला नसल्यानेच अशा चुका झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.शासनाकडे पाठविलेल्या विकास आराखड्यात म्हारळ गाव शेजारील आरक्षित भूखंड व कॅम्प नं-५ येथील भूखंडावर नियोजित कब्रस्तान दाखविण्यात आले होते. मात्र मंजूर झालेल्या शहर विकास आराखड्यात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविल्याने शाळा व झोपडपट्टीधारकात खळबळ उडाली. नवीन शहर विकास आराखड्याची पोलखोल विशेष महासभेत बाहेर काढणार असून, विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. विकास आराखड्यात कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील आरक्षण क्र-१५५ मध्ये कब्रस्तान दाखविण्यात आले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर मराठी शाळेचे मैदान व शेजारील झोपडपट्टी आरक्षण क्र-१५५ मध्ये येते. असी प्रतिक्रीया महापालिका नगररचनाकार विभागातील अभियंता कुमार जग्यासी यांनी दिली.