शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

भिवंडी महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद; १५ दिवसात ११ कोटींचा कर भरणा

By नितीन पंडित | Updated: December 27, 2023 16:05 IST

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी १५ दिवस राबवलेल्या व्याज दरात सुट देणाऱ्या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

नितीन पंडित,भिवंडी: महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी १५ दिवस राबवलेल्या व्याज दरात सुट देणाऱ्या अभय योजनेच्या कालावधीत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून या पंधरा दिवसांच्या कालावधीत ११ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुली झाली आहे.यामध्ये ८ कोटी रोख रक्कम व ३ कोटी रुपयांच्या धनादेशांचा समावेश आहे.अभय योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महापालिका प्रशासनाकडून अभय योजनेची मुदत आठ दिवसांनी वाढवण्यात आली असून आता ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

भिवंडी महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी रक्कम ६२५ कोटी रुपयांची आहे.आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी सर्व अधिकारी,विभाग प्रमुख,कर्मचारी,भूभाग लिपिक यांना सक्त आदेश दिले होते .त्याची परिणीती होऊन पालिकेच्या कर्मचार्‍यांनी घेतलेल्या परिश्रमांना यश मिळाले आहे.  महापालिका आर्थिक वसुली कमी असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे.त्यामुळे आयुक्त अजय वैद्य यांनी महसूल वसुलीसाठी अभय योजना सुरू केली.पालिका प्रशासनाने यापूर्वी १६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत १५ दिवसांसाठी अभय योजना जाहीर केली होती.त्यावेळी १२ कोटी ४८ लाख ७१ हजार १५८ रुपये थकबाकी व चालू आर्थिक वर्षातील ३ कोटी ९२ लाख ४९ हजार ४२६ रुपये जमा झाले होते.अशा प्रकारे एकूण १६ कोटी ४१ लाख ३९ हजार १८४ रुपयांचा कर जमा झाला आहे.त्यानंतर अभय योजनेचे यश पाहून महापालिका आयुक्तांनी पुन्हा ९ ते २३ डिसेंबर या १५ दिवसांसाठी अभय योजना सुरू केली.या कालावधीत ११ कोटी रुपये जमा करण्यात आले.

 भिवंडीत यंत्रमाग व्यवसायातील पगाराची तारीख २५ असल्याने या योजनेचा फायदा घेण्यास अनेकांनी प्रतिसाद देत मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली असता आयुक्तांनी ही योजना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती कर निर्धारण अधिकारी सुदाम जाधव यांनी दिली आहे.चालू आर्थिक वर्षात आता पर्यंत ४६ कोटी मालमत्ता कर वसुली केली असून ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत एक कोटी रुपयांनी अधिक असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिका