शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट

By नितीन पंडित | Updated: July 22, 2023 20:50 IST

येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.

भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळ नगर परिसरात अंतर्गत गटारे जमिनीदोस्त झाली असल्याने गटारातील पाणी रहिवासी संकुलनांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.            गोपाळ नगर परिसरात महापालिकेने सुशोभीकरण केले असून हे सुशोभीकरण करताना मनपाने अंतर्गत गटार व नाल्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून बाजूला असलेल्या रहिवासी संकुलांबरोबरच दांडेकर विद्यालयात देखील हे पाणी भारत असते त्यामुळे सौचालय व गटारांचे पाणी देखील बाहेर येत असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी येत असते तसेच नागरिकांना होणार पाणी पुरवठा देखील दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून या भागात असलेल्या मनपाच्या नाल्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील रहिवाश्यांनी आमदार शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.         आमच्या मागणीकडे महापालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत असल्याने अखेर शनिवारी आम्ही आमदार रईस शेख यांची भेट घेतली असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी काढण्यात येणार असून घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार शेख यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती गोपाळ नगर रहिवाशांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी